Next
‘येस बँके’तर्फे ‘येस जीएसटी’ सुविधा सुरू
प्रेस रिलीज
Tuesday, April 17, 2018 | 01:06 PM
15 0 0
Share this story

मुंबई : येस बँक या भारतातील चौथ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या खासगी बँकेने मायक्रो, स्मॉल अँड मीडिअम एन्टरप्रायजेससाठी (एमएसएमई) ‘येस जीएसटी’ ही ओव्हर ड्राफ्ट (ओडी) सुविधा सुरू केल्याची घोषणा केली आहे. या क्षेत्रातील या पहिल्यावहिल्या उपक्रमाद्वारे ‘एमएसएमईं’ना त्यांच्या वार्षिक उलाढाल, जीएसटी रिटर्न यानुसार एक कोटी रुपयांपर्यंत ‘ओडी’ सुविधा घेता येऊ शकते. बॅलन्स शीटचे किंवा बँक स्टेटमेंटचे आणखी मूल्यमापन करण्याची आवश्यकता नाही.

‘एमएसएमई’ना निवासी किंवा व्यावसायिक मालमत्ता मॉर्गेज करून ‘ओडी’ सुविधा घेता येईल. मंजूर झालेल्या रक्कमेचा वापर ‘एमएसएमई’ना पूर्णतः किंवा टप्प्याटप्प्याने करता येईल. बँकेने आर्थिक वर्ष २०१८-१९मध्ये ‘येस जीएसटी’द्वारे एक हजार कोटी रुपयांचे वितरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. येस बँकेने ३१ मार्च २०१८पर्यंत ‘एमएसएमईं’शी केलेला एकूण व्यवहार 32 हजार ५०० कोटी रुपयांचा आहे.

या उपक्रमाविषयी बोलताना, येस बँकेचे समूह अध्यक्ष व ब्रांच व रिटेल बँकिंग हेड राजन पेंटल म्हणाले, ‘एमएसएमई हा देशाचा कणा आहे व सरकारच्या उद्दिष्टानुसार, येस बँक ‘एमएसएमईं’ना त्यांच्या प्रगतीमध्ये पाठिंबा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. हे उत्पादन दाखल करून, ‘एमएसएमई’ची खेळत्या भांडवलासाठीची आर्थिक गरज जलद व सुरळीत पूर्ण करण्याचे, तसेच त्यामुळे त्यांना शाश्वत व स्पर्धात्मक राहण्यासाठी मदत करण्याचे बँकेचे उद्दिष्ट आहे.’

अर्ज करण्यासाठी ‘एमएसएमईं’नी बँकेच्या वेबसाइटवर क्वेरी नोंदवावी, त्यानंतर येस बँकेचा प्रतिनिधी अर्जदाराशी संपर्क करेल. आवश्यक कागदपत्रे विचारात घेता, ‘एमएसएमईं’नी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ‘जीएसटी’ रिटर्न आणि निवासी वा व्यावसायिक मालमत्तेची कागदपत्रे सादर करावीत.

‘एमएसएमईं’ना बदल समजून घेण्यास आणि नवी ‘जीएसटी’ करप्रणाली अवलंबण्यासाठी त्यांची तयारी करण्यासाठी येस बँकेने गेल्या वर्षी ‘येस जीएसटी’ कार्यक्रम जाहीर केला. बँकेने आजपर्यंत ११२ जागृतीपर कार्यशाळा आयोजित केल्या आहेत व या कार्यक्रमाद्वारे नऊ हजार ५०० ‘एमएसएमईं’वर परिणाम साधला आहे.

रिस्पॉन्सिबल बँकिंगनुसार येस बँक ‘एमएसएमई’ क्षेत्राला पाठबळ देत आहे आणि त्यांना शाश्वत प्रगती करण्यासाठी मदत करण्याच्या दृष्टीने सहकार्य करत आहे. ‘एमएसएमई’ क्षेत्र सक्षम करण्यासाठी येस बँक महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि त्याचे प्रतीक म्हणजे, बँकेला एशियामनी या एका आघाडीच्या जागतिक वित्तीय संस्थेने आयोजित केलेल्या एशियामनी कंट्री अवॉर्ड्स २०१८मध्ये ‘बेस्ट बँक फॉर स्मॉल अँड मीडिअम एन्टरप्राइजेस (एसएमई) – इंडिया’ पुरस्काराने गौरवण्यात आले. बँकेने ‘एमएसएमई’ व महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी भांडवल उपलब्ध केले आहे आणि आतापर्यंत ओपिक व वेल्स फार्गो यांच्या भागीदारीने ४१५ दशलक्ष डॉलरचा निधी उभारला आहे.

‘येस बँके’विषयी :
येस बँक ही भारतातील चौथ्या क्रमांकाची मोठी खासगी बँक असून, ती भारतातील २९ राज्ये व सात केंद्रशासित प्रदेशांत कार्यरत आहे. बँकेचे मुख्यालय मुंबईतील लोअर परेल इनोव्हेशन डिस्ट्रिक्ट (एलपीआयडी) येथे आहे. संस्थापक राणा कपूर आणि त्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापन गटाच्या, अत्यंत दर्जेदार, ग्राहक केंद्रित, सेवांवर आधारित, भारताच्या भविष्यातील व्यवसायांना सेवा देणारी खासगी बँक स्थापन करण्याच्या व्यावसायिक व उद्योजकताविषयक बांधिलकी, दूरदृष्टी व धोरणाचे फलित आहे.

बँकेने आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती, सेवेबाबत गुणवत्तेची आणि कार्यात्मक उत्कृष्टतेची उच्च प्रमाणके अवलंबली आहेत आणि बँकेतर्फे सर्व ग्राहकांना समावेशक बँकिंग सेवा व वित्तीय सुविधा दिल्या जातात. बँकेचा बँकिंगप्रती आणि रिटेल, कॉर्पोरेट व उदयोन्मुख कॉर्पोरेट बँकिंग ग्राहकांप्रती दृष्टिकोन ज्ञानावर आधारित आहे. भारतातील प्रोफेशनलची बँक म्हणून येस बँक सातत्याने आपल्या वैशिष्ट्यांमध्ये बदल घडवून आणत असून, भारतातील सर्वोत्कृष्ट दर्जेदार बँक बनणे हे बँकेचे व्हिजन आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link