रफीसाहेबांच्या आवाजाशी नातं सांगणारे गायक मोहम्मद अझीझ, ‘टीन आयडॉल’ म्हणून गाजलेली लिंडसे लोहान, ‘हायस्कूल म्युझिकल’मुळे गाजलेली अॅश्ले टिसडेल आणि अलीकडेच झळकलेल्या ‘द लीजंड ऑफ टारझन’ची जेन मारगॉ रॉबी यांचा दोन जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय... .....
मोहम्मद अझीझ
दोन जुलै १९५४ रोजी कोलकात्यात जन्मलेला मोहम्मद अझीझ हा कलाकार हिंदी, बंगाली आणि ओडिशाच्या चित्रपटसृष्टीत गायक म्हणून प्रसिद्ध आहे. रफीसाहेबांच्या आवाजाशी नातं सांगणारे जे अनेक गायक नंतरच्या काळात येऊन गेले, त्यांपैकीच अझीझ हे एक म्हणता येतील. ‘ज्योती’ या बंगाली सिनेमाद्वारे त्यांची पार्श्वगायनाची सुरुवात झाली. ‘आखिर क्यूं’मध्ये त्यांनी राजेश खन्नासाठी गायलेलं ‘
एक अंधेरा लाख सितारे’ हे गाणं आणि ‘खुदगर्ज’ सिनेमातलं ‘
आपके आ जाने से’ अशी त्यांची गाणी त्या काळी विशेष लोकप्रिय झाली होती. अमिताभसाठीही त्यांनी ‘मर्द’ चित्रपटाकरिता पार्श्वगायन केलं होतं. त्यांनी प्रामुख्याने उडिया भाषेत गायन केलं आहे.
.......
लिंडसे लोहान
दोन जुलै १९८६ रोजी न्यूयॉर्कमध्ये जन्मलेली लिंडसे लोहान ही तरुण अभिनेत्री आणि गायिका. तिने फॅशन डिझायनिंगच्या दुनियेतही काम केलं आहे. ‘
दी पॅरन्ट ट्रॅप’ या समीक्षकांनी वाखाणलेल्या सिनेमातल्या तिच्या जुळ्या मुलींच्या भूमिका गाजल्या आणि ती प्रसिद्धीच्या झोतात आली. पुढच्याच ‘
फ्रिकी फ्रायडे’ मधल्या तिच्या ‘अॅना कोलमन’च्या भूमिकेचंही कौतुक झालं. त्यानंतर आलेल्या ‘मीन गर्ल्स’ या टीन कॉमेडी फिल्मने तिला टीन आयडॉल बनवलं! ‘गेट ए क्ल्यू’, ‘हर्बी : फुल्ली लोडेड’ आणि ‘जस्ट माय लक’ हे तिचे सिनेमेही गाजले. तिच्या गायनाच्या अल्बमचंही लोकांनी स्वागत केलं आणि त्यांवर ‘प्लॅटिनम आणि गोल्ड’ खपाची मोहर उठवली होती. ‘स्पीड द प्लो’ नाटकातून तिने रंगभूमीसुद्धा गाजवली. कन्फेशन्स ऑफ ए टीनेज ड्रामा क्वीन, ए प्रेअरी होम कम्पॅनिअन, लेबर पेन्स, जॉर्जिया रूल्स, चाप्टर २७, लीझ अँड डिक, आय नो हू किल्ड मी, असे तिचे अनेक सिनेमे गाजले आहेत.
.........
अॅश्ले टिसडेल
दोन जुलै १९८५ रोजी मॉन्मथ काउंटीमध्ये (न्यू जर्सी) जन्मलेली अॅश्ले टिसडेल ही ‘
हायस्कूल म्युझिकल’च्या सर्वच भागांतून शार्पे इव्हान्स म्हणून झळकून लोकप्रिय झालेली गायिका-अभिनेत्री; मात्र ती सर्वप्रथम प्रसिद्धीच्या झोतात आली होती ते ‘स्वीट लीफ ऑफ झॅक अँड कोडी’ या डिझ्नीच्या सीरियलमधून!
हेलकॅट्स, ए बग्स लाइफ, दी मेयर ऑफ ऑयस्टर बे, व्हिस्पर ऑफ दी हार्ट, पिक्चर धिस,
स्केरी मूव्ही ५, सेव्हिंग सँटा, ब्रिंग इट ऑन, चार्मिंग, असे तिचे सिनेमे गाजले आहेत.
.......
मारगॉ रॉबी
दोन जुलै १९९० रोजी क्वीन्सलँडमध्ये जन्मलेली मारगॉ रॉबी ही २०१६ सालच्या ‘
दी लीजंड ऑफ टारझन’मधून टारझनची जेन म्हणून गाजलेली अभिनेत्री. त्याआधी तिचे ‘
दी वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’, ‘अबाउट टाइम’, ‘फोकस’ असे सिनेमे गाजले होते.
गेल्या तीन वर्षांत आलेले तिचे ‘स्युसाइड स्क्वॉड’, ‘आय, तोन्या’, ‘पीटर रॅबिट’, ‘टर्मिनल’, ‘मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स’ असे सिनेमे चर्चेत होते.
...
यांचाही आज जन्मदिन :
कथाकार, अनुवादक वामन शिवराम आपटे
विनोदी कथाकार
वि. आ. बुवा : दोन जुलै १९२६ - १७ एप्रिल २०११
(त्यांच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी येथे क्लिक करा.)कादंबरीकार
हेर्मन हेस : दोन जुलै १८७७ - आठ सप्टेंबर १९६२
(त्यांच्याविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)