Next
कौशल्य विकास मोहिमेचा चौथा वर्धापनदिन साजरा
BOI
Wednesday, July 17, 2019 | 02:00 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : जागतिक कौशल्य दिनाच्या निमित्ताने कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे नवी दिल्ली येथे कौशल्य विकास मोहिमेचा चौथा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याबरोबरच कायदा व न्याय आणि संचार मंत्री रवी शंकर प्रसाद, मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल, कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर, एमएसडीई मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडेय, अक्षय उर्जा राज्यमंत्री आर. के. सिंग, एनएसडीसीचे अध्यक्ष व एल अॅंड टी समुहाचे अध्यक्ष ए. एम. नाईक, एमएसडीईचे सचिव डॉ. के. पी. कृष्णन, एमएसडीईचे सहसचिव राजेश अगरवाल, नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एनएसडीसी) व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनिष कुमार उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध सरकारी विभाग व खासगी क्षेत्रादरम्यान सामंजस्य करार करण्यात आले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search