Next
ग्रीन बिल्डिंग सोल्युशन्स चर्चासत्राला चांगला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Tuesday, March 27, 2018 | 02:28 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘बांधकाम क्षेत्र झपाट्याने वाढत आहे, मात्र ही बांधकामे  पर्यावरणपूरक होण्यासाठी पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याचा आग्रह सर्वांनी धरला पाहिजे,’ असे प्रतिपादन ‘हैद्राबाद मेट्रो रेल’ प्रकल्पाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गाडगीळ यांनी केले. ‘जयसन्स कन्स्ट्रक्शन सोल्युशन्स’ आयोजित ‘ग्रीन बिल्डिंग सोल्युशन्स’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. ज्येष्ठ उद्योजक उमेश जोशी, अच्युत वाटवे, जयसन्स कन्स्ट्रक्शन सोल्युशन्सचे संस्थापक जयंत देवगावकर, मंदार देवगावकर यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. 

विवेक गाडगीळ यांनी पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. पर्यावरणपूरक बांधकाम क्षेत्रातील  जयसन्स कन्स्ट्रक्शन सोल्युशन्सच्या  तीन दशकांच्या योगदानाबद्दल, संस्थापक जयंत देवगावकर यांचा या वेळी विवेक गाडगीळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

विवेक गाडगीळविवेक गाडगीळ म्हणाले, ‘पर्यावरणपूरक बांधकामासाठी कल्पक आणि अभिनव कामे करणाऱ्या नियोजनकर्त्यांची बांधकाम क्षेत्रात गरज आहे. बांधकाम क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीला, पर्यावरणपूरक आणि कल्पक बांधकाम करण्याची मोठी संधी उपलब्ध असून, त्यांनी सतत नव्या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा अभ्यास करत राहिले पाहिजे.’

जयंत देवगावकर म्हणाले, ‘१९९०पासून बांधकाम क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि आव्हाने बदलली आहेत. तंत्रकुशल कर्मचारी असतील तर ग्राहकांचे समाधान करण्यात यश येते.’

मंदार देवगावकर म्हणाले, ‘अत्याधुनिक, जागतिक दर्जाच्या बांधकाम साहित्याच्या स्थानिक पातळीवरील निर्मितीसाठी आम्ही कार्यरत राहणार असून, त्यासाठी संशोधन विकास विभाग पिरंगुट येथे सुरू करण्यात आला आहे.’

मंदार देवगावकरपरव्हिअस सिमेंट पेव्हिंग, सर्फेसिंग (पाण्याला झिरपू देणारा आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढविणारा पृष्ठभाग ), उष्णतारोधक  हिट रेझिस्टंट रिफ्लेक्टिव्ह  कोटिंग  (न तापणाऱ्या टेरेससाठी), लाईट वेट इन्सुलेटिंग  रेडी मिक्स  काँक्रीट (यात थर्माकोलसारखे वेस्ट मटेरियल वापरता येते) अशा अत्याधुनिक पर्यावरण पूरक बांधकाम साहित्याचा परिचय या वेळी मंदार देवगावकर यांनी करून दिला. 

भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश  गोगावले, ‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’चे संचालक राजेंद्र आवटे, ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’चे अध्यक्ष गणेश जाधव तसेच, बांधकाम क्षेत्रातील अनेक मान्यवर या चर्चासत्राला उपस्थित होते. अमृता देवगावकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link