Next
पूना हॉटेलियर्स असोसिएशनतर्फे रक्तदान मोहिम
प्रेस रिलीज
Friday, May 11 | 01:44 PM
15 0 0
Share this story

पुणे :  पूना हॉटेलिअर्स असोसिएशन (पीएचए), स्थानिक हॉटेल्स व जेडब्ल्यू मॅरिएटतर्फे जागतिक थॅलिसिमिया दिनानिमित्त १७ एप्रिल ते सात मे दरम्यान रक्तदान मोहीम आयोजित करण्यात आली होती. 

पूना हॉटेलिअर्स असोसिएशनचे मुख्य कामकाज अधिकारी निरव पंचामिया
पूना हॉटेलिअर्स असोसिएशनचे मुख्य कामकाज अधिकारी निरव पंचामिया यांनी या उपक्रमाची धुरा सांभाळली. याद्वारे जनकल्याण रक्तपेढीसाठी तीनशे युनिटस रक्त संकलित केले. ही रक्तदान मोहिम पुण्यातील आठ हॉटेल्समध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये साठपेक्षा अधिक हॉटेल्समधून पाचशे ९७ स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. या रक्तदान उपक्रमाला तीनशे ९७ दाते लाभले.  शेरेटन ग्रँड हॉटेल, फोर पॉईंटस बाय शेरेटन, कोरेगाव पार्क येथील द वेस्टीन, लवासा येथील फार्च्यून सिलेक्ट दासवे ही हॉटेल्स या उपक्रमाला सहकार्य करण्यासाठी एकत्र आली होती. काही हॉटेल्सनी ही मोहीम होस्ट करत तर, काहींनी स्वयंसेवकांच्या माध्यमातून सहकार्य केले. या व्यापक रक्तदान मोहीमेचा समारोप सात मे रोजी जेडब्ल्यू मॅरिएट येथे करण्यात आला.

जेडब्ल्यू मॅरिएट पुणेचे सरव्यवस्थापक विनीत मिश्रा
जेडब्ल्यू मॅरिएट पुणेचे सरव्यवस्थापक आणि पूना हॉटेलिअर्स असोसिएशनच्या कार्यकारी समितीचे सदस्य विनीत मिश्रा म्हणाले, ‘या महान कार्याचा भाग बनल्याचा जेडब्ल्यू मॅरिएटला अभिमान आहे. कारण या मोहीमेमुळे थॅलिसिमिया हा अनुवांशिक रक्त विकार असणाऱ्या अनेक रुग्णांचे जीव वाचण्यास मदत होऊ शकते. पीएचएच्यावतीने मी या मोहिमेतील प्रत्येक सहभागी आणि दात्यांचे आभार मानतो. ज्यांच्यामुळे ही मोहीम यशस्वी होऊ शकली.’ 

पूना हॉटेलिअर्स असोसिएशनचे मुख्य कामकाज अधिकारी निरव पंचामिया म्हणाले, ‘पूना हॉटेलिअर्स असोसिएशन पुण्यातील सर्व हॉटेल्सचा आवाज बनले आहे. संपूर्ण शहरातील हॉटेलियर्स जीव वाचविण्याची क्षमता असलेल्या या महान कार्यासाठी एकत्रित आले आहेत. प्रत्येक सहभागी व्यक्तीने केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.’

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, पाश्चिमात्य देशांमधील थॅलिसिमियाने ग्रस्त असलेल्या रुग्णांपैकी ९० टक्क्यांहून अधिक रुग्ण सामान्य आयुष्य जगतात, तर भारतात जवळपास निम्मे रुग्ण प्रौढावस्था येण्याआधीच मरण पावतात. भारतातील जवळपास ३.९ टक्के लोकसंख्या थॅलिसिमिया या अनुवांशिक रक्त विकाराची वाहक आहे.  हा आजार पूर्णतः बरा करण्यासाठी काही उपचार उपलब्ध नाहीत; पण नियमित उपचार घेतल्यास आणि मुख्यतः रक्त संक्रमण केल्याने रुग्णाला सामान्य आयुष्य जगण्यास मदत होऊ शकते. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link