Next
‘अर्थसंकल्प दिलासादायक’
सहकारतज्ज्ञ अॅड. दीपक पटवर्धन यांची प्रतिक्रिया
BOI
Friday, February 01, 2019 | 05:20 PM
15 0 0
Share this story

अॅड. दीपक पटवर्धनरत्नागिरी : ‘अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा कठोर आर्थिक निर्णयांना मनापासून प्रतिसाद देणाऱ्या देशवासीयांना मोठा दिलासा आहे,’ अशी प्रतिक्रिया येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. दीपक पटवर्धन यांनी एक फेब्रुवारी २०१९ रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर दिली.

आज प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात यात शेतकरी, मजूर, मच्छिमार या घटकांना प्रामुख्याने सामावून घेण्यात आले आहे. या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अॅड. पटवर्धन म्हणाले, ‘जवळपास ४० कोटी देशवासीयांना थेट व्यक्तिगत लाभ देणारा हा अर्थसंकल्प आहे. आयकर मर्यादेत पाच लाखांपर्यंत करमाफी, ५० हजारांचे स्टँन्डर्ड डिडक्शन, ४० हजारापर्यंतच्या ठेव व्याज टीडीएस कपातीच्या अटी बाहेर, अशा तरतुदी असणारा हा अर्थसंकल्प जनतेचा अर्थसंकल्प म्हणून सर्वसामान्य होईल. पंतप्रधान किसान सन्मान योजना लहान शेतकऱ्यांना मोठा आधार देणारी ठरेल. याचबरोबर ६० वर्षीय मजुरांना पेन्शन देऊन १० कोटी मजुरांना सन्मान देण्याचे काम मोदी शासनाने अर्थसंकल्पाचे माध्यमातून केले आहे.’

‘ग्रामीण रस्त्यांसाठी केलेली भरघोस तरतूद, गोधनाचे महत्त्व लक्षात घेऊन राष्ट्रीय कामधेनू आयोगाची स्थापना हे अत्यंत मुलभूत विषय या अर्थसंकल्पाने साकार केला आहे. दोन वर्षे नोटाबंदी, जीएसटी आदी महत्त्वपूर्ण पण अत्यंत कडक संकल्पना मोदी शासनाने राबवल्या; मात्र देशाच्या जनतेने मोदींवर विश्वासून या संकल्पना यशस्वी होण्यासाठी सहयोग दिला. त्या कठोर निर्णयाचा लाभ आता देशाच्या अर्थव्यवस्थेला होऊ लागला आहे. १२ लाख कोटींपर्यंत पोहोचलेले टॅक्स कलेक्शन, ६.८० कोटी करदाते, ३८ हजार फर्जी कंपन्याना लागलेले टाळे, सहा हजार ८०० कोटींची बेनामी मालमत्ता जप्त, सोळाशे कोटी विदेशी संपत्ती जप्त अशा अनेक गोष्टी साध्य झाल्या व देशाच्या उत्पनात मोठी भर पडली. अर्थव्यवस्था स्वच्छ होण्याची प्रक्रिया गतिमान झाली,’ असे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले.

 ‘जीएसटी या नव्या करप्रणालीचा प्रभाव उत्पन्नावर सकारात्मक होऊ लागला आहे. जानेवारी २०१९ मध्ये एक लाख कोटींवर जीएसटी जमा झाला, ही आकडेवारी अर्थकारणाला गतिमानता येत असल्याचे स्पष्ट करते आणि या सर्व प्रक्रियेत मनापासून सहभागी झालेल्या देशवासीयांना याचा योग्य लाभ देण्यासाठी या अर्थसंकल्पात आलेल्या तरतुदी जनमानसाला सकारात्मक संदेश देणाऱ्या आणि जनतेच्या मनातली अपेक्षा पूर्ण करणाऱ्या आहेत,’ असेही ते म्हणाले.

अत्यंत प्रभावी आणि सर्व घटकांना सामावून विकास मार्गावर अग्रेसर करणारा हा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जनतेतील प्रतिभेला शोभणारा असल्याचे अॅड. पटवर्धन यांनी नमूद केले.

(अर्थसंकल्पातील तरतुदींबद्दल सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link