Next
कलम ३७० रद्द : हिमायतनगरात शिवसेना- भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
नागेश शिंदे
Monday, August 05, 2019 | 06:08 PM
15 0 0
Share this article:



हिमायतनगर :
जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून, दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाच ऑगस्ट रोजी राज्यसभेत केली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे देशभरातून स्वागत होत आहे. हिमायतनगर शहरातील शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनीही याबद्दल मोठा जल्लोष केला. 

या कार्यकर्त्यांनी शहरातील परमेश्वर मंदिरासमोर फटाके फोडून, एकमेकाना पेढे भरवून सरकारचे अभिनदंन केले. भारत माता की जय, नरेंद्र मोदी जिंदाबाद, भाजपा-शिवसेना पक्षांचा विजय असो, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.

या वेळी नगराध्यक्ष कुणाल राठोड, शिवसेना तालुका अध्यक्ष रामभाऊ ठाकरे, भाजप तालुका अध्यक्ष आशिष सकवान, ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे, भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, प्रकाश रामदिनवार, रामदास रामदिनवार, राम नरवाडे, खंडू चव्हाण, गजानन चायल, सुभाष माने, नगरसेवक विनायक मेडके, हिदायतखान पठाण, योगेश चिल्कावार, अमोल धुमाळे, बालाजी ढोणे, विलास उट्टलवाड यांच्यासह भाजप-शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search