Next
‘ब्रेन डेव्हलपमेंट’ शिष्यवृत्ती परीक्षेत दामले विद्यालयाचे दहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत
BOI
Friday, April 05, 2019 | 10:57 AM
15 0 0
Share this article:

‘बीडीएस’ परीक्षेत यशस्वी झालेले दामले विद्यालयाचे विद्यार्थी.

रत्नागिरी :
रत्नागिरी नगर परिषदेची शाळा क्रमांक १५ अर्थात दामले विद्यालयातील १० विद्यार्थी ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप (बीडीएस) परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकले आहेत. या शाळेतील विद्यार्थी विविध परीक्षांत उज्ज्वल यश मिळवत असतात. या परीक्षेतही तीच परंपरा त्यांनी कायम राखली आहे. सहावीतील मधुरा पावसकरने देशात ५१वा, जय कांबळेने ७०वा, तर श्रावस्ती यादवने ९०वा क्रमांक प्राप्त केला आहे. हे तीन विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. 

या परीक्षेला शाळेतून पहिली ते सातवीपर्यंतचे ८० विद्यार्थी बसले होते. त्यातील दहा विद्यार्थ्यांना पदके मिळाली. 

यशवंत विद्यार्थ्यांची नावे अशी – 
पहिली : आयुष कोकणी (८७ गुण/कांस्यपदक), मार्तंड गावंड (८७/कांस्यपदक)
दुसरी : श्रावस्ती यादव (९०/सुवर्णपदक), आर्षती कारेकर (८९/रौप्यपदक)
चौथी : दत्तप्रसाद मुळ्ये (७५/ कांस्यपदक), श्रेया मुद्गल (७४/कांस्यपदक)
सहावी : मधुरा पावसकर (९१/सुवर्णपदक), जय कांबळे (८९/सुवर्णपदक), आर्यन पानकर (८२/रौप्यपदक), चिन्मय सागवेकर (७८/कांस्यपदक).

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आतापर्यंत शाळेचे २००हून अधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. या वर्षी प्रथमच शाळेतून बीडीएस परीक्षेसाठीही विद्यार्थी बसले होते. पहिल्याच वर्षी दहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्यामुळे शाळेने यशाची नवी परंपरा सुरू केली आहे. 

या विद्यार्थ्यांना सारिका गोरे, कंचन पवार, गौरी रजपूत, कल्पना कोकणी, दादासाहेब भंडारी, भावना मोटघरे-वाघेला, मंजिरी लिमये, स्नेहल नार्वेकर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. प्रशासन अधिकारी सुधाकर मुरकुटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुंडलिक कांबळे, उपाध्यक्षा दिव्या सावंतदेसाई, मुख्याध्यापक प्रकाश जाधव यांच्यासह सर्व पालकांनी यशस्वितांचे अभिनंदन केले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search