Next
‘अर्ली चाईल्डहूड असोसिएशन’तर्फे बालवाडी मदतनीस कौशल्य विकास कार्यशाळा
प्रेस रिलीज
Tuesday, July 03 | 06:14 PM
15 0 0
Share this story

पुणे : बालवाड्यांमधील मदतनीसांच्या कौशल्य विकासासाठी ‘अर्ली चाईल्डहूड असोसिएशन’तर्फे सिम्बायोसिस विश्वभवन येथे सोमवारी पहिल्या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राज्यभरात कार्यरत असलेल्या बालवाड्यांतून ५०० हून अधिक मदतनीस सहभागी झाले होते. संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा स्वाती पोपट वत्स यांनी मार्गदर्शन केले. 

स्वाती पोपट वत्स
मदतनीसांनी  मुलांशी कसे वागावे, स्वत:ची स्वच्छता व आरोग्य याची काळजी कशी घ्यावी, कामाची ठिकाणी स्वच्छता कशी राखावी, मुलांना जेवण कसे द्यावे, त्यांच्याशी संवाद कसा साधावा, मुलांना कसे हाताळावे, कोणत्या पद्धतीने स्पर्श करावा अथवा करू नये, हातमोज्यांचा वापर आदी विषयांवर त्यांनी  मार्गदर्शन केले.

त्या पुढे  म्हणाल्या, ‘शून्य ते सहा वर्षे वयोगटातील लहान मुलांच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा विद्यार्थी दशेची सुरुवात करणाऱ्या  बालवाड्यांमधील शिक्षकांचे प्रशिक्षण आणि कौशल्य विकास ही कायमच दुर्लक्षित बाब होती. या क्षेत्रात काम करण्याच्या दृष्टीकोनातून २०११ मध्ये ‘अर्ली चाईल्डहूड असोसिएशन’ संस्थेची स्थापना करण्यात आली. शिक्षकांच्या प्रशिक्षणाबरोबरच बालवाड्यांमध्ये काम करणाऱ्या  मदतनीसांचा कौशल्य विकास हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे ही बाब लक्षात आल्याने असोसिएशनने त्यादृष्टीने काम सुरू केले आहे. पुणे विभागाने या बाबतीत पुढाकार घेतला व मदतनीसांसाठीच्या पहिल्या पथदर्शी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले.’ 

‘या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादामुळे व त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन अर्ली चाईल्डहूड असोसिएशनच्या वतीने यापुढे हा उपक्रम देशभर राबविण्यात येईल. येत्या काही दिवसात मुंबई आणि बंगळूरू येथे अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येतील’,असे वत्स यांनी या वेळी स्पष्ट केले.

पुणे विभाग प्रमुख आदित्य तापडिया
‘पुण्यात येत्या २८ जुलै रोजी प्रथमच पालकांसाठी ‘स्क्रीन अँड स्क्रीम पेरेंटिंग शिबीर’ आयोजित करण्यात येणार आहे’, अशी माहिती  पुणे विभागाचे प्रमुख आदित्य तापडिया यांनी दिली.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link