Next
डॉ. पी. पी. कुलकर्णींना ‘इंडो-नेपाळ अॅवॉर्ड’ प्रदान
BOI
Wednesday, November 28, 2018 | 02:01 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. पी. पी. कुलकर्णी यांना इंडो-नेपाळ एकता अॅवॉर्ड देऊन २५ नोव्हेंबर २०१८ रोजी सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार नेपाळचे माजी पंतप्रधान लोकेंद्र बहादूरचंद, उपप्रधानमंत्री टोप बहादूर रायमाझी आणि सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश कुलदीप शर्मा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नवी दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयातील दी इंडियन सोसायटी ऑफ इंडरनॅशनल लॉ सभागृहात इंडो-नेपाळ सांस्कृतिक परिषदेमध्ये प्रशस्तिपत्र, सुवर्णपदक व मानपत्र देऊन डॉ. कुलकर्णींना सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध क्षेत्रांतील प्रतिभावान व्यक्तींना इंडो-नेपाळ सांस्कृतिक परिषदेमध्ये गौरवण्यात येते. पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून फक्त दोघांची निवड झाली. 

डॉ. कुलकर्णी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात गेली ३१ वर्षे रसायनशास्त्राचे अध्यापन करत आहेत. ते मुंबई विद्यापीठात पीएचडीचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोग, मुंबई विद्यापीठ यांचे चार संशोधन प्रकल्प पूर्ण केले. त्यांना महाविद्यालयाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे समन्वयक आहेत. त्याद्वारे ते गेली १२ वर्षे जिल्ह्यात विज्ञान प्रसार, प्रचार करत आहेत. त्यांचे शैक्षणिक, संशोधनात्मक आणि विज्ञान क्षेत्रातील सामाजिक कार्य यांची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. 

२००७मध्ये त्यांना मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्हणून गौरवण्यात आले होते. त्यांना पत्रकार संघाची राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप मिळाली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, सचिव सतीश शेवडे आणि प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Abhijit kulkarni About 87 Days ago
congrates for this award. keep it up & all the best for the future journey
0
0

Select Language
Share Link