Next
‘सीआयएसएफ’चा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रम संपन्न
BOI
Monday, March 18, 2019 | 05:29 PM
15 0 0
Share this article:


नाशिक : देशाला चलन पुरवठा करणाऱ्या नाशिक येथील ‘नोट प्रेस’च्या ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला’चा (सीआयएसएफ) सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन नाशिक रोड येथील नेहरूनगरस्थित प्रेस वसाहतीच्या जागेत उत्साहात संपन्न झाला. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा झाल्या. ‘नोट प्रेस’च्या सुरक्षारक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेतला.

मागील काही वर्षांपासून, नाशिक रोडच्या आयएसपी आणि सीएनपी या दोन्हीं प्रेसची सुरक्षा पोलिसांएवजी आयएसएफकडे आली आहे. नेहरू नगरमधील प्रेस कर्मचाऱ्यांच्या इमारतींमध्येच या दलाच्या सुमारे ६०० जवानांची निवासाची सोय करण्यात आली आहे. दलाच्या युनिट लाईनमध्ये सुवर्णमहोत्सवी वर्धापदिन साजरा करण्यात आला. 

यानिमित्त जवानांच्या मुलांनी देशभक्तीपर गाणी, नाच, समूह गीते सादर केली. या वेळी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यांत व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, गोळाफेक यांचा समावेश होता.  सुरुवातीला जवानांनी संचलन करून मानवंदना दिली. नंतर स्वसंरक्षण आणि शस्त्रास्त्रे यांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. जवानांच्या कुटुंबीयांसाठी धावणे, लिंबू-चमचा, रस्सीखेच आदी स्पर्धा झाल्या. सायंकाळी नृत्य, गायन व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिके वितरीत करण्यात आली.

या वेळी आयएसपीचे मुख्य व्यवस्थापक सुधीर साहू, सीएनपीचे मुख्य व्यवस्थापक वर्मा, उप महाव्यवस्थापक व्ही. एम. ढाके, सीआयएसफचे डेप्युटी कमांडट आर. के. राय, आर. एस. सिंग, निरीक्षक एम. के. वेणुगोपाल, नंदीलाल चित्ते, व्ही. आर. बिरादर, प्रेस मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search