Next
सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे मेळाव्याचे आयोजन
सहकार मंत्री सुभाष देशमुख साधणार सोलापूरकरांशी संवाद
प्रेस रिलीज
Saturday, December 15, 2018 | 02:54 PM
15 0 0
Share this story

पुणे : सोलापूर जिल्यात ओढवेलेल्या दुष्काळी परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे पुण्यातील सोलापूरकरांचा मेळावा १६ डिसेंबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आला आहे. डीपी रोड येथील पंडित फार्मस् येथे सकाळी १० वाजता हा मेळावा होईल. यात सहकारमंत्री सुभाष देशमुख उपस्थित राहून सोलापूरकरांशी संवाद साधणार आहेत; तसेच पुढील वाटचालीच्या दृष्टीने मार्गदर्शन करणार आहेत.

फाउंडेशनतर्फे नुकतेच सोलापूर महोत्सव आयोजित केला होता. या तीन दिवसीय महोत्सवाला मूळच्या सोलापूरच्या परंतु आता पुणे येथे स्थायिक झालेल्या हजारो पुणेकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला होता. आता फाउंडेशनने आणखी एक पाऊल उचलत सोलापूरची श्रीमंती वाढवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, त्यासाठी पुण्यात स्थायिक झालेले सोलापूरकर कसा हातभार लावू शकतात या या विषयांबरोबरच सोलापूर जिल्ह्यावर आलेले दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी, जनावरांसाठी चारा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना, त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत देण्यासंदर्भात या मेळाव्यात चर्चा केली जाणार आहे.

‘सोलापुरातील अनेक मान्यवरांनी पुणे येथे विविध क्षेत्रात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवून आपले स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या सर्व मान्यवरांचा गाठीभेटींमार्फत एकत्रित येण्याचा योग या माध्यमातून येणार आहे. मूळचे सोलापूरचे असलेले, परंतु आता व्यवसाय, व्यापार, नोकरी अथवा इतर कामानिमित्त पुणे, पिंपरी-चिंचवड येथे स्थायिक असलेल्या सोलापुरकरांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे,’ असे आवाहन सोलापूर सोशल फाऊंडेशनकडून करण्यात आले आहे.

मेळाव्याविषयी :
दिवस :
रविवार, १६ डिसेंबर २०१८
वेळ : सकाळी १० वाजता
स्थळ : पंडित फार्मस्, राजाराम पुलाजवळ, डी. पी. रोड, कोथरुड, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link