Next
‘आयएसएचआरएई’तर्फे पुण्यात ‘व्हीआरएफ दंगल’चे आयोजन
प्रेस रिलीज
Tuesday, May 21, 2019 | 12:50 PM
15 0 0
Share this article:

पुणे : इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग रेफ्रिजरेशन अ‍ॅंड एअरकंडिशनिंग इंजिनीअर्सच्या (आयएसएचआरएई) पुणे चॅप्टरतर्फे ‘व्हीआरएफ दंगल’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन २४ मे २०१९ रोजी हॉटेल ग्रँड शेरटन बंडगार्डन रोड येथे सायंकाळी पाच वाजता करण्यात आले आहे. 

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एचव्हीएसीआर कन्सल्टिंग इंजिनीअर्सचे प्रिन्सिपल कन्सल्टंट आर. एस. कुलकर्णी, तर विशेष अतिथी म्हणून निवृत्त आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख उपस्थित राहतील. याबरोबरच ‘व्हीआरएफ दंगल’चे समन्वयक दीपक वाणी, ‘आयएसएचआरएई’ पुणे चॅप्टरच्या पश्‍चिम विभागाचे प्रादेशिक संचालक केदार पत्की, सचिव विरेंद्र बोराडे, खजिनदार सतीश मेनन आणि ‘आयएसएचआरएई’ पुणे चॅप्टरचे कार्यक्रम अध्यक्ष अमिषा मेदन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या विषयी माहिती देताना ‘आयएसएचआरएई’ पुणे चॅप्टरचे अध्यक्ष नंदकिशोर माटोडे म्हणाले, ‘‘व्हीआरएफ’ हे तंत्रज्ञान १९८०च्या दशकात जपानमध्ये विकसित झाले आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर भारतातील कमर्शियल कुलिंग व स्पेस कुलिंग क्षेत्रात होतो. सध्या भारतीय बाजारपेठेत युएसए, चीन, जपान, कोरिया येथील तंत्रज्ञान वापरले जाते. ‘व्हीआरएफ दंगल’च्या पहिल्या आवृत्तीद्वारे आमच्या सदस्यांना या तंत्रज्ञानातील प्रगतीची माहिती देणारे तांत्रिक कार्यक्रम व चर्चासत्र आयोजित केले आहेत. यासाठी एईओएन बिल्डिंग डिझाइन कन्सल्टंटस एलएलपीचे व्यवस्थापकीय भागीदार आशिष राखेजा आणि अल्बुस इंजिनीअरिंग कन्सल्टंटसचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश पाठक हे मार्गदर्शन करतील.

कार्यक्रमाविषयी :
दिवस : शुक्रवार, २४ मे २०१९ 
वेळ : सायंकाळी पाच वाजता 
स्थळ : हॉटेल ग्रँड शेरटन, बंडगार्डन रोड, पुणे
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search