Next
‘आयसीआयसीआय अॅकॅडमी’तर्फे जागतिक युवा कौशल्य दिन साजरा
प्रेस रिलीज
Tuesday, July 16, 2019 | 01:03 PM
15 0 0
Share this article:

पुणे : आयसीआयसीआय फाउंडेशन फॉर इन्क्लुजिव्ह ग्रोथने (आयसीआयसीआय फाउंडेशन) स्थापन केलेल्या आयसीआयसीआय अॅकॅडमी फॉर स्किल्सतर्फे (आयसीआयसीआय अॅकॅडमी) जागतिक युवा कौशल्य दिन १५ जुलैला साजरा करण्यात आला. या दिनानिमित्ताने पुण्यातील आठ हजाराहून अधिक गरजू व्यक्तींना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. 

ऑक्टोबर २०१३मध्ये सुरू झालेली आयसीआयसीआय अॅकॅडमी फॉर स्किल्सतर्फे गरजू युवकांना विक्री कौशल्य, कार्यालयीन प्रशासन, वेब डिझाइनिंग, इलेक्ट्रिल व घरगुती उपकरणांची दुरुस्ती, रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग दुरुस्ती, सेंट्रल एअर कंडिशनिंग, पम्प व मोटर दुरुस्ती, रिटेल कॅफे ऑपरेशन्स, पेंट अप्लिकेशन टेक्निक, ट्रॅक्टर मेकॅनिक, वेब डिझाइनिंग, टू व थ्री व्हीलर सर्व्हिस टेक्निशिअन, रिटेल विक्री, असिस्टंट ब्युटी थेरपिस्ट व होम हेल्थ एडी कम्युनिकेशन, वित्त, एटिकेट व ग्रुमिंग अशा १२ शाखांच्या कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. यामुळे कामाच्या ठिकाणी जुळवून घेण्यास मदत होते. प्रशिक्षणाबरोबर, आयसीआयसीआय अॅकॅडमी प्रशिक्षणार्थींना गणवेश, जेवण व महत्त्वाचे सर्व साहित्य पुरवले जाते.

प्रबोधनपर मूकनाट्य सादर करताना आयसीआयसीआय अॅकॅडमी फॉर स्किल्सचे विद्यार्थी

आयसीआयसीआय अॅकॅडमीतर्फे जागृतीपर कार्यक्रम आयोजित करणे, राज्याच्या विविध भागांत युवकांसाठी समुपदेशन सत्रे घेणे, प्रशिक्षणार्थी मिळवण्यासाठी राज्य सरकारची मदत घेणे, एनजीओंची मदत घेणे, रेफरल्स व वॉक-इनचे आणि एम्प्लॉयरकडून आलेल्या संदर्भांचे मूल्यमापन करणे यांचे आयोजन केले जाते.

२८ नोव्हेंबर २०१३ रोजी स्थापन झालेल्या पुणे केंद्रामार्फत वंचित व गरीब युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाते आणि ‘कार्यालय प्रशासन’ व ‘विक्री कौशल्ये’ या बाबतीत तीन महिन्यांचे कोर्स चालवले जातात. किमान बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या १८ ते ३० वर्षे वयोगटातील महिलांना या कोर्ससाठी अर्ज करता येऊ शकतो.

अनुभव कथन करताना पुण्यातील फडके हौद येथे असलेल्या आयसीआयसीआय अॅकॅडमी फॉर स्किल्सचे विद्यार्थी.

कार्यालयीन प्रशासन कार्यक्रमासाठीचा अभ्यासक्रम नॉलेज पार्टनर टॅली सोल्यूशन्स प्रा. लि.च्या मार्फत तयार करण्यात आला आहे. पुणे येथील अकादमीने प्रशिक्षित युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी ८०हून अधिक एम्प्लॉयरशी सहयोग केला आहे. रिलायन्स, नेक्सा, बजाज फिनसर्व्ह, पीव्हीआर फोर्ब्ज, क्रोमा व मॅजिकब्रिक्स यांनी पुणे येथील अकादमीतील प्रशिक्षणार्थींमधून काहींची नियुक्ती केली आहे. सध्या, पुणे येथील आयसीआयसीआय अॅकॅडमीमध्ये २५०हून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. आयसीआयसीआय अॅकॅडमीने आतापर्यंत प्रशिक्षित असलेल्या पात्र युवकांना १०० टक्के प्लेसमेंट दिली आहे. स्थापना झाल्यापासून अकादमीने पुणे येथे आठ हजारांहून अधिक जणांना प्रशिक्षण दिले आहे.

या विषयी बोलताना आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक व आयसीआयसीआय फाउंडेशन फॉर इन्क्लुजिव्ह ग्रोथच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य अनुप बागची म्हणाले, ‘वंचित व गरजू युवकांना स्थानिक स्तरावर महत्त्वाची असणारी कौशल्ये शिकण्याची संधी उपलब्ध करून, भारतातील आर्थिक समावेशकतेमध्ये वाढ करण्यात योगदान देण्याच्या हेतूने आयसीआयसीआय फाउंडेशनने २०१३मध्ये आयसीआयसीआय अॅकॅडमी फॉर स्किल्सची स्थापना केली. कुशल मनुष्यबळाची चणचण कमी करण्याच्या व जॉब मार्केट उपलब्ध करण्याच्या हेतूने अकादमीचे कार्यक्रम आखले आहेत; तसेच, हे कार्यक्रम उद्योगाच्या दृष्टीने मह्त्त्वाचे असलेल्या कार्यक्रमांवर भर देतात, जेणेकरून युवकांना स्थानिक स्तरावर शाश्वत रोजगार मिळू शकेल.’


‘आतापर्यंत आयसीआयसीआय अॅकॅडमीची देशात २५ केंद्रे असून, त्याद्वारे १२ शाखांमध्ये मोफत अभ्यासक्रम चालवले जातात. स्थापनेपासून स्किल अॅकॅडमींनी १.२ लाखांहून अधिक जणांना प्रशिक्षण दिले असून, त्यात ४८ हजार महिला आहेत. या अॅकॅडमींनी त्यांच्या प्रशिक्षित युवकांसाठी १०० टक्के प्लेसमेंट साध्य केली आहे. आमच्या प्रयत्नांमुळे तरुण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनत आहेतच, शिवाय स्थानिक अर्थव्यवस्थाही सक्षम होत आहे. आज आपल्या उपक्रमाद्वारे आयसीआयसीआय अॅकॅडमी, आयसीआयसीआय रुरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स (आरएसईटीआय) व आयसीआयसीआय फाउंडेशनने अंदाजे चार लाख जणांना प्रशिक्षण दिले असून, त्यामध्ये महिलांचे प्रमाण ५४ टक्के आहे,’ असे बागची यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search