Next
‘प्रल’ लघुपटाने जागवला रंगभूमीवरचा सुवर्णकाळ
प्र. ल. मयेकर स्मृती महोत्सवाला प्रतिसाद
BOI
Monday, June 17, 2019 | 05:48 PM
15 0 0
Share this article:

ज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर स्मृती स्मरणिकेचे प्रकाशन करताना उद्योजक रवींद्र सामंत, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, ज्येष्ठ रंगकर्मी रामांजली गोवेकर, कृष्णकांत लिंगायत आणि समीर इंदुलकर.

रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे रा. भा. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात प्र. ल. मयेकर स्मृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा महोत्सव समर्थ रंगभूमीने सादर केलेल्या ‘प्रलंं’वरील लघुपटाने ज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या येथील शाखेतर्फे ज्येष्ठ रंगकर्मीं गोवेकर आणि लिंगायत यांचा, तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष डॉ. चोरगे यांच्या बॅंक व्यवस्थापन पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. रत्नागिरी शाखेने ज्येष्ठ नाटककार प्रभाकर लक्ष्मण मयेकर (प्रल) यांच्या आठवणी जागविणारी एक स्मरणिका तयार केली. या स्मरणिकेचे प्रकाशन उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ‘प्रल’ लघुपटाची निर्मिती करणारे श्रीकांत पाटील आणि दुर्गेश आखाडे यांचाही सत्कार उद्योजक सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. 

दीर्घांक सादर करणाऱ्या दोन्ही संस्थांना गौरविण्यात आले. या वेळी नाट्य परिषद शाखेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर उपस्थित होते. महोत्सवात कणकवलीच्या वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानतर्फे ‘राजा ओयदिपौस’ आणि कुडाळच्या बाबा वर्दम थिएटर्सतर्फे ‘आहे मनोहर तरी’ हे दीर्घांक महोत्सवात सादर करण्यात आले.

(सोबत लघुपटाच्या ट्रेलरचा व्हिडिओ देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search