Next
भारतीय कला, संस्कृती, परंपरा या विषयांवर ढेपेवाड्यातर्फे चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन
BOI
Tuesday, September 24, 2019 | 04:28 PM
15 1 0
Share this article:

पुणे : ‘भारतीय कला, संस्कृती, परंपरा’ या विषयांवर ढेपेवाड्यातर्फे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या चित्रांचे प्रदर्शन २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत पुण्यातील बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. अशा विषयाची स्पर्धा व प्रदर्शन पुण्यात आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ढेपेवाड्याचे संस्थापक नितीन ढेपे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. 

व्यावसायिक आणि हौशी कलाकारांसाठी ही स्पर्धा असून, त्यात अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. भारतीय सण, पारंपरिक खेळ, पारंपरिक वेशभूषा, पारंपरिक दागिने, भारतीय वास्तुरचनाशास्त्र, नृत्य प्रकार, भारतीय संगीत आणि वाद्ये, भारतीय ग्रामीण घरे व निसर्ग आणि मुक्त चित्रकला हे स्पर्धेचे विषय आहेत. २७ सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता उद्घाटन सोहळा रंगणार आहे. 
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search