Next
‘दुष्काळामुळे मुलांच्या शिक्षणात अडथळा येत कामा नये’
सांगोल्यातील शेतकऱ्यांना शरद पवारांचा मदतीचा हात
BOI
Tuesday, April 30, 2019 | 04:09 PM
15 0 0
Share this article:


सांगोला : ‘दुष्काळामुळे मुलांच्या शिक्षणात अडथळा येत असेल, तर मदत करण्याबाबत प्रयत्न करू,’ असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सध्या राज्यातील दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर आहेत. नुकताच त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी यलमार मंगेवाडी येथील चारा छावण्यांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.


सध्या फक्त पाच जनावरांना छावणीत प्रवेश आहे, सरसकट जनावरांना चारा छावणीत प्रवेश मिळावा, रोज पंधरा किलो चारा मिळतो, जनावरांना अधिक चारा मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी या वेळी पवार यांच्याकडे केली. दुष्काळाआधी दोन हजार लिटर दूध संकलन होत असलेल्या यलमार मंगेवाडी गावात आता दूध संकलन दोनशे लिटरवर आले आहे, अशी भीषण परिस्थिती आली असल्याची माहिती गावकऱ्यांनी पवार यांना दिली. 

या वेळी पवार यांनी शेतकऱ्यांकडून दुष्काळी परिस्थिती जाणून घेतली;, तसेच गावातील किती मुले शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत याबाबतची विचारणाही केली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search