Next
‘प्रेमा तुझा रंग कसा’चा विशेष भाग ३० सप्टेंबरला
प्रेस रिलीज
Wednesday, September 26 | 02:21 PM
15 0 0
Share this story

मुंबई : प्रेमाचे विविध रंग आणि त्यातून घडणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनांचा वेध घेणाऱ्या ‘स्टार प्रवाह’वरील ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या कार्यक्रमाचा विशेष भाग ३० सप्टेंबरला दाखविण्यात येणार आहे. यात एक अनोखी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या खास भागाचे नाव ‘पिंजरा’ असे आहे.

‘पिंजरा’ नावाचा हा विशेष भाग रविवार ३० सप्टेंबरला दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.ही गोष्ट लावणीसम्राज्ञी मेनकाची आणि तिच्या रूपावर भुललेल्या संग्रामची व आपल्या फायद्यासाठी मेनकाला मिळवू पाहणाऱ्या सागरची आहे. तमाशाचे फड रंगवणाऱ्या मेनकेची पंचक्रोशीत चर्चा असते. पैशांचा माज असलेल्या संग्रामला मेनकाविषयी माहिती मिळते आणि तिच्या शोधात तो निघतो. पहिल्याच भेटीत तो तिच्या प्रेमात पडतो; पण संग्राम आणि मेनकाच्या या प्रेमकथेत एंट्री होते ती सागरची. सागर त्याच्या सिनेमासाठी एका लावणी डान्सरच्या शोधात असतो आणि त्याला मेनकाविषयी समजते. तिथेच सुरुवात होते नव्या युद्धाला. मेनकावर जीव ओवाळून टाकणारा संग्राम विरुद्ध सागर अशी जंग छेडली जाते. प्रेमाच्या या लढाईत विजय नेमका कुणाचा होतो, याची रंजक कथा ‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या या विशेष भागात मांडण्यात आली आहे.

यात सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांच्या खुमासदार शैलीने या विशेष भागाची रंगत आणखी वाढणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link