Next
लहान मुली देणार वाहतुकीच्या नियमांचे धडे
‘लायन्स क्लब्स इंटरनॅशनल’तर्फे आगळावेगळा उपक्रम
प्रेस रिलीज
Wednesday, October 03, 2018 | 11:08 AM
15 1 0
Share this article:

पुणे : अलीकडील काळात वाहनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने अनेकदा वाहतूक ठप्प होते. मोठ्या शहरांत तर या समस्येला नेहमीच सामोरे जावे लागते. ही बाब हेरून पुण्यातील विविध शाळांमधील २०० लहान मुली एकत्र येऊन वाहनधारकांमध्ये वाहतुकीचे नियम पालन व शिस्त याबाबत जागृती करणार असून, वाहतूक शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

‘लायन्स क्लब्स इंटरनॅशनल ३२३४ डी२’ या प्रांतातर्फे चार ऑक्टोबर २०१८ सकाळी ८.३० वाजता अलका टॉकीज चौकाजवळ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त के. वेंकटेशम, महापौर मुक्ता टिळक, लायन्स क्लबचे प्रांताधिकारी लायन रमेश शहा, लायन्स प्रांतीय अध्यक्ष तथा ट्रॅफिक अवरेनेस लायन नंदा पंडित, रिजन चेअरमन लायन बिपिन पाटोळे, झोन चेअरमन लायन संतोष पंडित, हेल्प रायडर्सचे संस्थापक प्रशांत कनोजिया व सहकारी यांसह पुण्यातील बहुतांशी लायन्स क्लबचे अधिकारी, राजकीय व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

उपक्रमाविषयी :
दिवस :
गुरुवार, चार ऑक्टोबर २०१८  
वेळ : सकाळी ८.३० वाजता
पत्ता : अलका टॉकीज चौक, पुणे.
अधिक माहितीसाठी संपर्क : कांचन बडवणे- ८४४६३ ९७०४४, दीपक आवळे- ९३७३६ ४५३९८
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search