Next
रत्नागिरीची स्वरदा महाबळ संस्कृत सुवर्णपदकाची मानकरी
BOI
Friday, January 18, 2019 | 12:15 PM
15 0 0
Share this article:

स्वरदा महाबळ सुवर्णपदक स्वीकारताना.

रत्नागिरी :
रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची स्वरदा उदय महाबळ ही विद्यार्थिनी २०१८-१९च्या पदवी परीक्षेत संस्कृत विषयात मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम आली आहे. त्यामुळे तिला मुंबई विद्यापीठाचे संस्कृत विषयासाठी असलेले लक्ष्मीबाई द्वारकानाथ नाईक सुवर्णपदक मिळाले आहे. मुंबई विद्यापीठात अलीकडेच झालेल्या दीक्षान्त समारंभात राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव, नोबेल पुरस्कार विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्टस्, कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. सुनील भिरूड, परीक्षा संचालक डॉ. अर्जुन घाटुळे आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत स्वरदा हिला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. 

स्वरदाने पहिल्या वर्षापासूनच मुंबई विद्यापीठाची ‘ओ’ ग्रेड मिळविली आहे. तिने तिसऱ्या वर्षी संस्कृत विषयात ८८.२५ टक्के गुण प्राप्त केले. यामुळे संस्कृत विषयासाठी असलेले सुवर्णपदक प्राप्त करण्याचा बहुमान तिला व गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला प्राप्त झाला. अभ्यासक्रमाबरोबरच विविध चर्चासत्रांमध्ये, संस्कृत स्पर्धा आणि विविध उपक्रमांमध्ये तिने सक्रीय सहभाग घेतला आहे. तसेच ती नृत्यविशारद असून, तिला अभिनयाची आवड आहे. या सर्व गोष्टी सांभाळत तिने सुवर्णपदक प्राप्त केल्याने तिचे विशेष कौतुक होत आहे.

या यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, सचिव सतीश शेवडे, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला शाखा उपप्राचार्या आणि संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, प्रा. जयंत अभ्यंकर, प्रा. स्नेहा शिवलकर आणि इतर महाविद्यालयीन प्राध्यापकांनी स्वरदाचे हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

(याच महाविद्यालयाच्या सोनल कांबळे या विद्यार्थिनीने यंदाच्या एमए परीक्षेत मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळविले आहे. तिच्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search