Next
एरो मॉडेल शो बच्चे कंपनीसाठी ठरणार पर्वणी
रत्नागिरीच्या आकाशात दहाहून अधिक विमानांची मॉडेल्स घेणार भरारी
BOI
Monday, December 31, 2018 | 02:34 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी : ‘रत्नागिरीतील पहिला एरो मॉडेल शो सहा जानेवारी २०१९ ला सकाळी ८.३० वाजता छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आयोजित करण्यात आला असून, यात फ्लाइंग ईगल, हवेवर संथ व खूप उंचावर तरंगणारे ग्लायडर, हायविंग ट्रेनर, बायप्लेन, उडती तबकडी, बॅनर घेऊन उडणारे विमान, ३० एरोबॅटीक, होममेड सुपर फ्लायर, भारतीय हवाई दलाची शान असणारे सुखोई ३० फायटर आणि भारतीय बनावटीचे तेजस विमानाची मॉडेल्स चित्तथरारक शो सादर करणार आहेत. रत्नागिरीतील बच्चे कंपनीसाठी हा शो अनोखी पर्वणी ठरेल,’ अशी माहिती नगराध्यक्ष राहुल पंडित व श्री इव्हेंट मॅनेजमेंटचे सचिन देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रत्नागिरी नगरपालिका आणि श्री इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या वतीने रत्नागिरीतील या पहिल्या एरो मॉडेल शोचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दहाहून अधिक विमानाची मॉडेल्स रत्नागिरीच्या आकाशात भरारी घेणार आहेत. शाळेतील लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये विमानाविषयीचे कुतूहल कायम असते. विमान उडते कसे, ते हवेत तरंगते कसे, ते टेकऑफ आणि लँडिंग करते कसे, असे अनेक प्रश्न असतात. या शोच्या माध्यमातून लहानग्यांसह मोठ्यांच्या मनातील सगळ्या प्रश्नांची मिळणार आहेत.

या शोसाठी विविध विमानांची मॉडेल्स रत्नागिरीमध्ये आणली जाणारा आहेत. गेली ४० वर्षे देशाच्या विविध शहरांमध्ये एरो मॉडेलिंगचे शो केलेले सदानंद काळे, अथर्व काळे आणि त्यांची टीम हा शो सादर करणार आहेत. सलग दोन तास ही प्रात्यक्षिके होणार असून, सदानंद काळे विमान तंत्रज्ञानाची माहिती उपस्थितांना देणार आहेत. शोची सुरुवात फ्लाइंग ईगलने होणार आहे. उंच आकाशात जाणाऱ्या एखाद्या पक्ष्याप्रमाणे हे फ्लाइंग ईगल उंच आकाशात जाईल. यानंतर या शोमधील सर्वाधिक उंचीवर जाणार ग्लायडर प्रेक्षकांसमोर येईल. रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून हवेत उडणारे ट्रेनर, उडती तबकडी, असे विमानाचे अनेक प्रकार या शो दरम्यान रत्नागिरीकरांसमोर येणार आहेत.

शोदरम्यान एक विमान सामाजिक संदेश देणारा बॅनर घेऊन आकाशात उडेल. एरोबॅटीक विमाने या शोचे सर्वाधिक आकर्षण असतील. आपल्या संरक्षण विभागात वापरल्या जाणाऱ्या विमानांची ही प्रतिकृती आहे. विमाने प्रत्यक्ष युद्ध भूमीवर ज्या पद्धतीने कसरती करतात तशाच पद्धतीने कसरती करून दाखवल्या जाणार आहेत. भारतीय विमान दलाची शान असलेली सुखोई-३० हे फायटर विमान आणि संपूर्ण भारतीय बनावटीचे श्रलर-तेजस या विमानाची प्रतिकृती आकाशात दाखवणारी प्रात्यक्षिके रोमांचकारी आणि उत्कंठा वाढवणारी ठरतील.

या शोसाठी शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना मैदानामध्ये निमंत्रित करण्यात आले आहे. पालकांनाही या शोमध्ये सहभागी होता येणार आहे. पॅव्हेलियनमध्ये बसण्यासाठी विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. उपनगराध्यक्षा स्मितल पावसकर यांनी मांडलेली ही संकल्पना नगराध्यक्ष राहुल पंडित, मुख्याधिकारी अरविंद माळी आणि सर्व नगरसेवकांच्या साथीने साकारली जात आहे. या वेळी श्री इव्हेंटचे धीरज पाटकर, राज घाडगावकर उपस्थित होते.

या शोमध्ये इलेक्ट्रीक मोटरवर उडणाऱ्या विमानाची मॉडेल्स विद्यार्थ्यांसमोर ठेवली जातील. विविध आकारातील ही रेडिओ कंट्रोल मॉडेल्स आकाशामध्ये विविध प्रात्यक्षिक दाखवतील. कार्यक्रमानंतर बच्चेकंपनीसाठी उडणाऱ्या विमानांची मॉडेल्स माफक दरात उपलब्ध असणार आहेत.

एरो मॉडेल शोविषयी :
दिवस :
सहा जानेवारी २०१९
वेळ : सकाळी ८.३० वाजता
ठिकाण : छत्रपती शिवाजी स्टेडियम, मारुती मंदिर, रत्नागिरी.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search