Next
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात राज्यस्तरीय कार्यशाळा
प्रेस रिलीज
Saturday, February 02, 2019 | 05:31 PM
15 0 0
Share this article:



औंध : येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालययात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ आणि वाणिज्य विभागातर्फे ‘संशोधन पद्धती’ या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर येथील बोरावके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एन. शिंदे, आकुर्डी येथील रामकृष्ण मोरे महाविद्यालय डॉ. सुधीर बोराटे, डॉ. संजय नगरकर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. शिंदे म्हणाले,  ‘आपले संशोधन नाविन्यपूर्ण, तसेच समाजोपयोगी असावे. आपल्या संशोधनामुळे अनेकांचे कल्याण होणार असेल, तरच ते उत्कृष्ट संशोधन असते.’



डॉ. नगरकर यांनी संशोधनाचा विषय कसा निवडावा, संशोधन कसे करावे या संदर्भात, तर डॉ. बोराटे यांनी संशोधनासाठी विषय निवडल्यानंतर त्याची मांडणी कशी करावी, संशोधन करताना कोणते नियम पाळावेत या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी नाविन्यपूर्ण शोध लावावेत या हेतूने ही एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवावा आणि स्वतःच्या नावावर पेटंट मिळवावे.’



कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. सुहास निंबाळकर यांनी करून दिली. प्रा. आसावरी शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी विकास मंडळाच्या चेअरमन डॉ. शशी कराळे यांनी आभार मानले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, प्रा. मयुर माळी, प्रा. कुशल पाखले, डॉ. तानाजी हातेकर, डॉ. अतुल चौरे उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search