Next
डॉ. आनंद नाडकर्णी
BOI
Friday, December 22 | 04:00 AM
15 0 0
Share this story

आपल्या मित्रांच्या कंपूत सहज गप्पा मारताना रंगात येऊन सांगाव्यात, तशा वेल्हाळ हकीकती सांगून आपल्याला गुंगवून टाकणाऱ्या ‘गद्धेपंचविशी’सारख्या तुफान वाचकप्रिय पुस्तकाचे आणि अनेक लोकप्रिय नाटकांचे लेखक आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचा २२ डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
 .........
२२ डिसेंबर १९५८ रोजी जन्मलेले आनंद नाडकर्णी हे लेखक, कवी, गीतकार, नाटककार, संवादक, दिग्दर्शक, भाष्यकार आणि त्याचबरोबर पेशाने मानसोपचारतज्ज्ञदेखील (एमडी) असं लोकप्रिय अष्टपैलू व्यक्तिमत्त्व! आपल्या वेध (VEDH - Vocational Education, Direction and Harmony) या चळवळीद्वारे ते कित्येक वर्ष तरुणांना व्यवसायासाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी मार्गदर्शन करत असतात.

त्यांनी २३ मार्च १९९० रोजी ठाण्यामध्ये आयपीएच अर्थात इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेची स्थापना करून त्याद्वारे क्लिनिकल उपचार, समुपदेशन अशा रूढ मार्गांबरोबरच साहित्य, संगीत, नाट्य, चित्र, संवाद अशा आनंददायी साधनांचा वापर करून तीव्र मानसिक आजारांवर उपचार करण्याचं मोठं काम सुरू केलं आहे.

त्यांच्या  अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘गद्धेपंचविशी’ आणि ‘विषादयोग’ पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.  त्यांच्या ‘मयसभा’ नाटकाला लेखन पुरस्कार मिळाला आहे. आम्ही जगतो बेफाम, रंग माझा वेगळा, जन्मरहस्य, त्या तिघांची गोष्ट, असेच आम्ही सारे, गेट वेल सून ही त्यांची नाटकं तुफान गाजली आहेत.

वैद्यकसत्ता, आरोग्याचा अर्थ, एका सायकिअॅट्रिस्टची डायरी, देवराईच्या सावलीत, मनोगती, मनोविकास, मितुले आणि रसाळ, स्वभाव-विभाव, हेही दिवस जातील अशी त्यांची अनेक पुस्तकं  प्रसिद्ध आहेत.

(डॉ. आनंद नाडकर्णी यांची पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link