Next
‘सजिली’तर्फे ब्युटी पार्लर व फॅशन डिझाइनचे प्रशिक्षण
BOI
Wednesday, December 26, 2018 | 01:22 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या उद्देशाने सजिली क्लासेसमार्फत मागासवर्गीय युवती व महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर व फॅशन डिझाइनचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

एक लाखाच्या आतील उत्पन्न असणार्‍या १८ ते ४५ वयोगटांतील किमान दहावी उत्तीर्ण महिला व युवतींना यामध्ये सहभागी होता येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या प्रशिक्षणार्थीला छात्रवृत्ती (स्टायपेंड) दिले जाणार असून, शासनाच्या व्यवसाय शिक्षण मंडळातर्फे प्रमाणपत्र दिले जाईल; तसेच वैयक्तिक दोन लाख व गट व्यवसायासाठी दहा लाख रुपयांपर्यंत बँकांमार्फत सवलतीच्या व्याजदरात कर्जही उपलब्ध होईल.

प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, बँक पासबुक, मतदान कार्ड यांच्या प्रत्येकी दोन सत्यप्रती आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. इच्छुकांनी ३१  तारखेपर्यंत नावनोंदणी करणे गरजेचे आहे.

नावनोंदणीसाठी पत्ता : सजिली स्पा अ‍ॅंड ब्युटी केअर, जेल रोड, पोलीस परेड ग्राउंडसमोर, रत्नागिरी
संपर्क : ८०८७२ २३१३२
वेळ : सकाळी ११ ते सायंकाळी पाच
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search