Next
नारद पत्रकारिता पुरस्कार वितरण २० जुलै रोजी
BOI
Monday, July 16, 2018 | 05:30 PM
15 0 0
Share this story

मुकुंद संगोराम
पुणे : विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराचे वितरण शुक्रवारी (ता. २०) विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष न्या. विष्णूजी कोकजे यांच्या हस्ते एका विशेष समारंभात करण्यात येणार आहे.

प्रवीण बिडवे‘या पुरस्कार उपक्रमाचे हे आठवे वर्ष असून, देवर्षी नारद जयंतीच्या निमित्ताने हे पुरस्कार देण्यात येतात. पत्रकारितेत उल्लेखनीय काम करणाऱ्या चार पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. ज्येष्ठ पत्रकारासाठीच्या पुरस्कारासाठी दै. ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम, युवा नवोदित पत्रकार पुरस्कारासाठी दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’ नाशिकचे प्रवीण बिडवे, छायाचित्रकार पुरस्कारासाठी सांगलीचे उदय देवळेकर आणि सोशल मीडिया पुरस्कारासाठी कोल्हापूरचे विनायक पाचलग यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्काराचे स्वरूप अनुक्रमे १५ हजार रुपये, अन्य तीन पुरस्कार सात हजार ५०० रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ असे आहे,’ अशी माहिती विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी, डी. ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी दिली.

उदय देवळेकर
हा कार्यक्रम शुक्रवारी, २० जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता फर्गुसन कॉलेजच्या अॅम्फी थिएटरमध्ये होणार आहे. न्या. कोकजे हे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष असून, ते मूळचे इंदूरचे आहेत. मध्य प्रदेशमध्ये त्यांनी २६ वर्षे उच्च न्यायालयात वकिली केली आहे. त्यांनी १९९० ते २००१ पर्यंत मध्य प्रदेश व राजस्थान उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले आहे. २००१-२००८ या काळात ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डी. ई. सोसायटीच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे भूषविणार आहेत.

विनायक पाचलग
यापूर्वी हे पुरस्कार ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर, बेळगाव ‘तरुण भारत’चे संपादक किरण ठाकूर, ‘दिव्य मराठी’चे संपादक प्रशांत दीक्षित, ‘मटा’ पुणे आवृत्तीचे संपादक पराग करंदीकर, ‘झी चोवीस तास’चे संपादक डॉ. उदय निरगुडकर, दिलीप धारूरकर, भाऊ तोरसेकर, युवा पत्रकार पुरस्कार ‘न्यूज १८ लोकम‘’च्या नाशिकच्या प्रतिनिधी दीप्ती राऊत, इंडिया टीव्ही, पुण्याचे प्रतिनिधी अजय कांबळे, ‘एबीपी माझा’चे नाशिकचे प्रतिनिधी सागर वैद्य, कोल्हापूर ‘लोकमत’च्या इंदुमती गणेश, ‘मटा’चे मुस्तफा आतार, दै. ‘लोकमत’चे पराग पोतदार, नगर ‘लोकमत’चे छायाचित्रकार राजू शेख आणि ‘अॅग्रोवन’चे छायाचित्रकार गणेश कोरे, व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे, राजेंद्र सरग आणि सोशल मीडिया पुरस्कार शेफाली वैद्य व देविदास देशपांडे यांना देण्यात आले आहेत.

‘या समारंभास पत्रकार व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,’ असे आवाहन विश्व संवाद केंद्र व डी. ई. सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे. या वेळी विश्व संवाद केंद्राचे कार्यवाह रवींद्र घाटपांडे, उपाध्यक्ष अभय कुलकर्णी, संपादक मिलिंद कांबळे आदी उपस्थित होते.

पुरस्कार वितरणाविषयी :
दिवस : शुक्रवार, २० जुलै २०१८
वेळ : सकाळी १०.३० वाजता
स्थळ : फर्ग्युसन कॉलेजचे अॅम्फी थिएटर, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Deshpande prakash About 247 Days ago
Prachi, We are thankful for wide publicity to today's press conference.vishwa sanvad kendra and Deccan education socty announced de varshi narad patekar puraskar fir 2018. Thanks to bytes of india. Prakash deshpande 9765708009
0
0

Select Language
Share Link