Next
रुपे ग्लोबल कार्ड्स वितरणाची संख्या ६४ दशलवर
प्रेस रिलीज
Monday, March 11, 2019 | 03:42 PM
15 0 0
Share this article:मुंबई : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) ६४ दशलक्ष रुपे ग्लोबल कार्डांचे वाटप करण्याचा विक्रमी टप्पा गाठला आहे. देशातील रुपे कार्ड नेटवर्कचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘एनपीसीआय’द्वारे रुपे ग्लोबल कार्ड्सचे वाटप केले जाते आणि ते भारताबाहेर वापरल्यास डिस्कव्हर नेटवर्कवर चालते. या भागिदारीमुळे रुपेसारख्या भारतातील कार्ड पेमेंट नेटवर्कला जागतिक पातळीवरही आपला ठसा उमटवण्यास मदत झाली आहे.

‘एनपीसीआय’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणा राय   म्हणाल्या, ‘आमच्या ६४ दशलक्ष रुपे ग्लोबल कार्ड ग्राहकांसाठी आंतरराष्ट्रीय स्वीकृती वाढवण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. डिस्कव्हरबरोबरच्या भागिदारीत रुपे ग्लोबल कार्डाची स्वीकृती १९० देशांतील ४१ दशलक्ष व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचली असून, ही संख्या सातत्याने वाढत आहे. रुपे ग्लोबल कार्डधारकांसाठी २००पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रस्ताव उपलब्ध असून, ग्राहकांसाठी ही वाढती स्वीकृती लाभदायक ठरत आहे.’

दोन्ही पेमेंट नेटवर्कमधील प्रस्थापित इंटरकनेक्शनमुळे या धोरणात्मक नात्याची व्याप्तीसह- ब्रँडेड रुपे डिस्कव्हर डेबिट व क्रेडिट कार्ड जागतिक पातळीवर स्वीकारले जाणारे वितरण भारतात ‘एनपीसीआय’ सदस्य बँकांद्वारे केले जाते. रुपे ग्लोबल डेबिट आणि क्रेडिट कार्ड सध्या ४० बँकांद्वारे वितरित केले जाते. डिस्कव्हर ग्लोबल नेटवर्कमध्ये डिस्कव्हर नेटवर्क, डायनर्स क्लब इंटरनॅशनल, पल्स आणि संबंधित नेटवर्क्सचा समावेश आहे.

‘आमच्या नात्यामुळे रुपे ग्लोबल कार्डधारकांना परदेशात प्रवास करताना त्यांची कार्ड्स डिस्कव्हर ग्लोबल नेटवर्कच्या मदतीने लाखो ठिकाणी वापरता येतात. कार्डधारकांची संख्या वाढेल, तशी डिस्कव्हरतर्फे लोकांना देशाबाहेर असताना त्यांच्या आवडीचे कार्ड वापरण्याची क्षमता पुरवली जाईल,’ असे डिस्कव्हरचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख जागतिक व्यवसाय विकास विभागाचे जोई हर्ले म्हणाले.

सध्या रुपे ग्लोबल कार्ड्स पाच प्रकारांत वितरित केली जात असून, त्यामध्ये रुपे क्लासिक डेबिट कार्ड, रुपे क्लासिक क्रेडिट कार्ड, रुपे प्लॅटिनम डेबिट कार्ड, रुपे प्लॅटिनम क्रेडिट कार्ड आणि रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्ड यांचा समावेश आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search