Next
दीर्घ मुदतीसाठी ‘हा’ शेअर जरूर घ्या
BOI
Sunday, June 17, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

‘ए. पी. एल. अपोलो ट्यूब्ज’ या कंपनीचा शेअर १८०० रुपयांवरून २५०० रुपयांपर्यंत गेला होता. आता तो पुन्हा १८०० रुपयांना उपलब्ध आहे. येत्या तीन वर्षांत त्याचे शेअरगणिक उपार्जन पावणेतीन पट होण्याची शक्यता असल्याने हा शेअर दीर्घ मुदतीसाठी घ्यायला हवा. याबद्दल जाणून घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
........
गेल्या आठवड्यात भारतात आणि जगात महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. त्या सर्वांचा शेअर बाजारावर अप्रत्यक्ष परिणाम होणे स्वाभाविक होते. उत्तर कोरिया अनेक अण्वस्त्रे बाळगून अमेरिकेला अप्रत्यक्ष धमकी देत होता. (चीनची त्याला फूस असण्याचीही शक्यता होती) पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ‘हम भी कुछ कम नही’ या थाटात आपला हेका कायम ठेवला होता. परिणामी जून महिन्यात ट्रम्प व उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जाँग उन यांची सिंगापूरमध्ये ऐतिहासिक भेट झाली. किम जाँग यांनी उत्तर कोरिया अण्वस्त्रबंदीला तयार राहील असे म्हटले आणि त्या बदल्यात ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला संपूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही दिली. तिसऱ्या महायुद्धाची भीती आता राहिली नाही.

नुकतीच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याज दरात पाव टक्का वाढ केली आणि यापुढेही दोन-तीन वेळा वाढ करण्याचे संकेत दिले. भारतातही रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्का वाढ करून, चार वर्षांनी तो सहाऐवजी सव्वासहा टक्के केला. त्यामुळे बँकांही आपले व्याजदर वाढवतील. 

‘ए. पी. एल. अपोलो ट्यूब्ज’ या कंपनीचा शेअर १८०० रुपयांवरून २५०० रुपयांपर्यंत गेला होता. आता तो पुन्हा १८०० रुपयांना उपलब्ध आहे. मार्च २०२०साठी त्याचे शेअरगणिक उपार्जन १२५ रुपये असेल व आजपासून तीन वर्षांनी म्हणजे मार्च २०२१मध्ये तर ते १७० रुपये असू शकेल. मार्च २०१८साठी ते ६८ रुपये होते. त्यामुळे येत्या तीन वर्षांत ते पावणेतीन पट होणार असल्याने हा शेअर दीर्घ मुदतीसाठी घ्यायला हवा. एका वर्षात तो २६०० रुपये व्हावा.
 
गेल्या शुक्रवारी निर्देशांक व निफ्टी अनुक्रमे ३५ हजार ६५८ व १० हजार ८२७ अंकांवर बंद झाले. समाधानकारक पावसाळा, सप्टेंबर तिमाहीचे नफ्याचे आकडे, राजस्थान, झारखंड व मध्य प्रदेश राज्यात होणाऱ्या विधानसभांच्या निवडणुका या गोष्टी बघितल्यावरच पुढचे अंदाज बांधता येतील.


- डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link