Next
या दाक्षिणात्य अभिनेत्रीने नाकारली फेअरनेस क्रीमची कोट्यवधींची जाहिरात
मांडली सौंदर्याची नवी परिभाषा
BOI
Saturday, June 01, 2019 | 06:32 PM
15 0 0
Share this article:

साई पल्लवीचेन्नई : दक्षिणेतील अभिनेत्री साई पल्लवी ही सध्या एका कारणासाठी चर्चेत आहे, ते तिने नाकारलेल्या एका फेअरनेस क्रीमच्या कोट्यवधींच्या जाहिरातीसाठी. दिसण्यातली सुंदरता खरी नसून, आत्मविश्वास हेच खरे सौंदर्य असल्याचे साईने म्हटले आहे. या विचारातून तिने दिसण्यावरून न्यूनगंड असणाऱ्यांसाठी एक नवा संदेश दिला आहे. 

मुळातच दक्षिणेतील अभिनेत्री या साध्या आणि सुटसुटीत मेक-अपसाठी ओळखल्या जातात. कोणताही भडक मेक-अप त्यांनी केलेला फार दिसत नाही. तरीही चित्रपटसृष्टी म्हटले, की गोरा रंग, नितळ त्वचा या गोष्टींनाच प्राधान्य दिले जाते. असे असताना साई पल्लवीने सौंदर्याची एक नवीन व्याख्याच सर्वांसमोर मांडली आहे. एका फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीत काम करण्यास चक्क नकार देत, ‘आपल्या त्वचेच्या रंगाशी आपण आत्मविश्वास बाळगला पाहिजे’, असे मत तिने व्यक्त केले आहे. 

‘प्रेमम’ या मल्याळम चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रसृष्टीत पदार्पण करणारी साई आत्मविश्वासाला खरे सौंदर्य म्हणत असताना आपले अनुभवही सांगते. ‘प्रेमम’ प्रदर्शित झाला तेव्हा त्यामधला तिचा ग्लॅम लूक चर्चेचा ठरला होता. तेलकट त्वचा आणि मुरुमांनी भरलेला चेहरा अशीच तिची एक ओळख बनली होती, मात्र पुढे काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आज ती दाक्षिणात्य चित्रसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. 

‘मी जशी आहे, तशी जेव्हा मला लोकांनी स्वीकारले, तेव्हा माझ्यातला आत्मविश्वास आणखी वाढला आणि मला समजले, की आपला आत्मविश्वास हेच आपले खरे सौंदर्य असते’, असे साई सांगते. 

काजल अगरवालयाच गोष्टीशी संबंधित आणखी एक नुकतीच घडलेली गोष्ट म्हणजे दाक्षिणात्य अभिनेत्री आणि बॉलीवूडमधील ‘सिंघम’, ‘स्पेशल २६’ या चित्रपटांमधून काम केलेली काजल अगरवाल हिने नुकताच आपला एक मेक-अप न करता काढलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अभिनयाबरोबरच सोशल मिडियावरही सक्रिय असलेल्या काजलने हा फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. 

या फोटोसोबत तिने लिहिलेल्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘लोकांनी आजकाल स्वतःला शोधणे बंद केले आहे. त्यामुळेच कदाचित आपण अशा एका जगात वावरत आहोत, जिथे शारीरिक आकर्षण आणि सोशल मिडिया या बाबींमुळे आपला आत्मसन्मान हरवून गेला आहे. अहंकार प्रत्येक ठिकाणी आहे. त्यामुळेच आपण करोडो रुपये मेक-अपवर खर्च करतो. हा मेक-अप आपले शारीरिक रूप तर सुंदर बनवतो, पण याच्यामुळे आपली आतली सुंदरता कुठे दिसून येते का...? त्यामुळे आपण जसे आहोत, तसे आपण स्वतःला स्वीकारले पाहिजे. यातून आपण खरेच खूप सुंदर आहोत, हे प्रत्येकाच्या लक्षात येईल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search