Next
अवयवदाता दिनानिमित्त ‘रुबी’तर्फे विशेष कार्यक्रम
प्रेस रिलीज
Tuesday, April 16, 2019 | 06:04 PM
15 0 0
Share this article:पुणे : अवयवदानाच्या पवित्र कार्याने समाजापुढे आदर्श निर्माण करणार्‍या कुटुंबियांना मानाचा मुजरा करून त्यांचा सन्मान करण्यासाठी रुबी हॉल क्लिनिकतर्फे ‘स्मरण अवयवदात्यांचे’ हा विशेष कार्यक्रम १५ एप्रिल २०१९ रोजी आयोजित केला होता.

या उपक्रमाची सुरूवात सकाळी एका जनजागृती रॅलीने झाली. ही रॅली रुबी हॉल क्लिनिकपासून हॉटेल ब्ल्यू नाइल कॉर्नरपासून साधू वासवानी चौक-जहांगीर हॉस्पिटल चौक मार्गे रुबी हॉल क्लिनिकपर्यंत आयोजित केली होती. त्यानंतर ‘मीट दी सुपरहिरोज’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन रुबी हॉल कॅन्सर सेंटरमधील डॉ. आर. एस. वाडिया ऑडिटोरियममध्ये करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे व सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, विशेष अतिथी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कामकाज अधिकारी डॉ. किशोर पुजारी, वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे, रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट, प्रत्यारोपण समन्वयक सुरेखा जोशी, डॉ. आशिष खनिजो, डॉ. सुनील शेणवी, डॉ. नीता मुन्सी, डॉ. शिरीष ऐंदे, डॉ. अभय हुपरिकर, डॉ. अभय सदरे, डॉ. सी. एन. मखले, डॉ. शीतल धडफळे-महाजनी आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना विद्या बाळ म्हणाल्या, ‘या कार्यक्रमाने महत्त्वाच्या विषयाबाबत आपल्याला जागे केले आहे. भावनाविवश करणार्‍या प्रसंगांमध्येही आपले मन शाबूत ठेऊन विवेकाचा आधार घेत अवयवदानाचा महत्त्वाचा निर्णय घेणे कौतुकास्पद आहे. आपला प्रिय व्यक्ती आपल्यासोबत नसेल, तरी ती व्यक्ती अनेकांच्या रूपाने अवयवदानामुळे जिवंत राहते. हा महत्त्वाचा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून देणे कौतुकास्पद आहे.’

डॉ. करमाळकर म्हणाले, ‘अवयवदानाबाबत आतापर्यंत फक्त आपण गोष्टी ऐकत आलो आहे; मात्र येथे उपस्थितांचे हृदयस्पर्शी अनुभव ऐकून मी प्रभावित झालो. अवयवदानाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मी प्रयत्न करेन.’

डॉ. पुजारी म्हणाले, ‘प्रसंगातून गेल्याशिवाय त्या गोष्टीचे आपल्याला महत्त्व कळत नाही; मात्र मृत्यूशी झुंजणारे रुग्ण आणि त्यांची जगण्याची तळमळ आम्ही रोज पाहतो. अवयवदानामुळे त्यांना एक नवजीवन मिळते म्हणूनच अवयवदान हे सर्वोत्कृष्ट दान असून, याबाबत अधिक जागृती करणे महत्त्वाचे आहे.’

डॉ. पठारे म्हणाले, ‘मागील वर्षी ज्या वीरांनी अवयवदान केले त्यांच्या नातेवाईकांचा सन्मान करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. यामुळे समाजात अवयवदानाबाबत अधिक जागरूकता निर्माण होईल, अशी आशा आहे.’

या प्रसंगी बोलताना बोमी भोट म्हणाले, ‘अवयव दान झालेले लोक हे म्हणजे लोकांनी केलेल्या दानामुळे दुसर्‍या लोकांच्या आयुष्यात कशाप्रकारे सकारात्मक बदल घडून येऊ शकतो याची जिवंत उदाहरणे आहेत. दान करण्याचा निर्णय हा बर्‍याचदा अतिशय दु:खद प्रसंगी होतो, पण या  निर्णयाचा दीर्घकालीन परिणाम चांगला असतो. समुपदेशन करणे, कार्यशाळा व जनजागृती यांसारख्या कार्यक्रमांद्वारे रुबी हॉल क्लिनिकने अवयवदान करण्याचे प्रमाण सुधारण्याच्या दिशेने लक्षणीय प्रगती केली आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search