Next
पुलवामा शहीदांसाठी कलाकारांचे श्रद्धांजली गीत
बिग बी, आमीर, रणबीर यांच्यानंतर आता ऐश्वर्या रायनेही चित्रित केला व्हिडिओ
BOI
Saturday, June 01, 2019 | 05:08 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : या वर्षी फेब्रुवारीत पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बॉलीवूडच्या काही कलाकारांनी ‘तू देश मेरा है’, हे एक श्रद्धांजली गीत तयार केले आहे. अमिताभ बच्चन, आमीर खान, कार्तिक आर्यन आणि रणबीर कपूरने या गाण्याचे रेकॉर्डिंग केले होते. आता अभिनेत्री ऐश्वर्या रॉयनेदेखील या गाण्यात सहभागी होऊन शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

ऐश्वर्या रॉय - बच्चन१४ फेब्रुवारी २०१९ला पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना देशाच्या सर्व स्तरांतून श्रद्धांजली वाहण्यात आली होती. यामध्ये कलाकार मंडळीही मागे नव्हती. अनेक कलाकारांनी आपापल्या पद्धतीने या शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली होती. अभिनेते अमिताभ बच्चन, आमीर खान, रणबीर कपूर आणि कार्तिक आर्यन या कलाकारांनी काही दिवसांपूर्वी ‘तू देश मेरा है’ या गाण्यावर व्हिडिओ रेकॉर्ड केला. यानंतर आता अभिनेत्री ऐश्वर्या रॉयनेही या व्हिडिओमध्ये सहभाग नोंदवला आहे. यातून तिने शहीदांच्या आठवणी जागवल्या आहेत. 

‘हॅप्पी प्रॉडक्शन’चे अभिषेक मिश्रा यांच्या संकल्पनेतून या गाण्याचा व्हिडिओ चित्रित होत असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या व्हिडिओमध्ये १४ कलाकार दिसणार आहेत. इतर सर्व कलाकारांनंतर आता अभिनेत्री ऐश्वर्यानेही नुकतेच या गाण्याचे चित्रिकरण केले असून पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना हे गाणे समर्पित केले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

याबाबत ‘सीआरपीएफ’ने एक ट्विट करत या सर्व कलाकारांचे आभार मानले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी अमिताभ बच्चन, आमीर आणि रणबीर या तिघांचा गाणे म्हणतानाचा एक फोटो ट्विट केला आहे आणि म्हटले आहे, ‘तुम्ही सर्व कलाकारांनी खूप चांगले काम केले आहे. तू देश मेरा हे गाणे तुम्ही शहीद जवानांना समर्पित केले आहे यासाठी आम्ही सगळे तुमचे खूप आभारी आहोत.’ २७ जुलैला पुलवामा शहीदांच्या स्मरणार्थ सीआरपीएफतर्फे या गीताचा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येणार आहे.  

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search