Next
‘डीकेटीई’च्या प्रा. ए. डी. पाटील यांना पीएचडी
प्रेस रिलीज
Friday, April 19, 2019 | 02:34 PM
15 0 0
Share this article:

प्रा. ए. डी. पाटीलइचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाइल अ‍ॅंड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटच्या विभागात कार्यरत असणारे प्रा. ए. डी. पाटील यांना बेळगाव येथील विश्‍वेश्‍वरय्या विद्यापीठाकडून ‘फॅकल्टी ऑफ सायन्स अ‍ॅंड टेक्नॉलॉजी’ अंतर्गत ‘पीएचडी इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग’ ही पदवी प्राप्त झाली. 

प्रा. पाटील हे ‘डीकेटीई’मध्ये गेली २३ वर्षे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ‘एक्स्प्रिमेंटल इन्व्हस्टीगेशन ऑफ अ‍ॅल्युमिनिअम अलॉय इंजिन सिंलिडर ब्लॉक इन टू व्हीलर्स’ या विषयावर पीएचडी प्रबंध पूर्ण केला आहे. अ‍ॅल्युमिनिअम अलॉय इंजिन सिंलिडर ब्लॉकच्या वापरामुळे सध्याच्या दुचाकींच्या अ‍ॅव्हरेजमध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली व इंधनाचे ज्वलन व्यवस्थित झाल्यामुळे प्रदुषणाचे प्रमाण ही खूपच कमी होते. यामुळे इंधनाची बचत होऊन पर्यावरणाचे संतुलन सुधारण्यास मदत होते. 

संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी प्रा. पाटील यांचे अभिनंदन केले व त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी ‘डीकेटीई’चे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील, विभागप्रमुख डॉ व्ही. आर. नाईक यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search