Next
कॉसमॉस ई सोल्यूशन्सला पुरस्कार
प्रेस रिलीज
Thursday, January 04 | 03:10 PM
15 0 0
Share this story

राजेंद्र गोडबोले, अमिताभ कांत, आरती ढोले, जॉर्ज वर्गीसे

पुणे : कॉसमॉस बँकेच्या स्वमालकीची उपकंपनी असलेल्या ‘कॉसमॉस ई सोल्यूशन्स अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला फायनान्शियल एक्सप्रेसतर्फे दिला जाणारा ‘एक्सप्रेस आय. टी. मोबिलिटी सोल्यूशन्स’ पुरस्कार मिळाला आहे. बेंगळुरु इथे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज वर्गीस उपस्थित होते.
 
‘हा पुरस्कार आमच्यासाठी अभिमानास्पद आहे,’ असे कॉसमॉस ई सोल्यूशन्सच्या व्यवस्थापकीय संचालिका आरती ढोले यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘कॉसमॉस ई सोल्यूशन्स नेहमीच सर्वोत्तम व विश्वासार्ह बँकिंग सोल्यूशन्स देण्यासाठी कटिबद्ध आहे. मोबाइल तंत्रज्ञानामुळे ऑनलाइन बँकिंग आता बँकिंग क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आले आहे. त्यामुळे कॉसमॉस ई सोल्यूशन्सने डोअरस्टेप बँकिंग सोल्यूशन्स प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीचा उपयोग टॅब बँकिंगद्वारे केला जाणार आहे. या प्रणालीमुळे ग्राहकांना घरबसल्या बँकिंग सेवा उपलब्ध होणार असून, बँकेला सर्व बँकिंग प्रक्रिया डिजिटल करता येणार आहेत.’

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गुगलचे भारत व दक्षिण पूर्व अशियाचे उपाध्यक्ष राजन आनंदन्, आय. आय. आय. आय. टी. बेंगळुरूचे संचालक प्रोफेसर सदगोपन्, नॅसकॉम प्रॉडक्ट कौन्सिलचे माजी अध्यक्ष रविराज गुरुराज, याहूचे माजी आर अँड डी विभागप्रमुख शरद शर्मा आणि भारतातील फेसबुक कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक उमंग बेदी यांनी काम पाहिले. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link