Next
‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन
BOI
Friday, July 19, 2019 | 12:54 PM
15 0 0
Share this article:

मालवण : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) मालवण शाखेच्या वतीने संध्या धोंडू मळेकर यांच्या स्मरणार्थ ‘माझा आवडता लेखक-लेखिका’ या विषयावर कोकण प्रभाग खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

मराठी भाषेच्या विकासासाठी आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याच्या हेतूने आयोजित या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे एक हजार ५२५, एक हजार २२५ आणि एक हजार २५ रुपये, तसेच ५२५ रुपयांची रोख दोन उत्तेजनार्थ पारितोषिके आणि सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्हे व प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. 

या स्पर्धेत पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे. मराठी भाषेतील आपल्या आवडत्या लेखक-लेखिकेच्या साहित्यकृतीचा चोखंदळपणे परामर्श करून तेच साहित्यिक का आवडतात याची परिणामकारक मांडणी जास्तीत जास्त एक हजार शब्दांत करायची आहे. निबंध स्वहस्ताक्षरात किंवा टाइप केलेला चालणार असून, स्पर्धकाने निबंधाच्या कागदावर नाव न लिहिता ते कव्हरिंग लेटरवर आपला पूर्ण पत्ता व मोबाइल क्रमांकासह लिहायचे आहे. हे निबंध १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत अनिरुद्ध आचरेकर यांच्याकडे पाठवायचे आहेत. १५ ऑक्टोबरला स्पर्धेचा निकाल वर्तमानपत्रातून जाहीर केला जाणार असल्याची माहिती ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी दिली आहे.

निबंध पाठवण्यासाठी पत्ता : अनिरुद्ध लक्ष्मण आचरेकर, सचिव, कोमसाप, मालवण द्वारा, न्यू इंग्लिश स्कूल आचरे, मु. पो. आचरे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग. पिन - ४१६ ६१४
मोबाइल : ९४२०२ ६१५३३ 
सुरेश ठाकूर : ९४२१२ ६३६६५
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search