Next
‘वेकफिट’चे नवीन उत्पादन बाजारात
प्रेस रिलीज
Wednesday, February 21, 2018 | 05:42 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारतीयांना सुखाने झोप घेता यावी यासाठी अभिनव मेमरी फोम मॅट्रेसेसचे उत्पादन आणि विक्री भारतातील प्रमुख कंपनी वेकफिट प्रयत्नशील असून, कंपनीने विविध उत्पादने बाजारात आणली आहेत जी ग्राहकांना स्वप्नवत अशी झोप मिळवून देतात. आपल्या तंत्रज्ञान आणि कल्पक रचनांनी सजलेल्या उत्पादनांद्वारे वेकफिटने बाजारात आपले अढळ स्थान निर्माण केले असून भारतातल्या गाद्या उत्पादनाची ९००० कोटींची बाजारपेठ काबीज करण्याचे तिचे ध्येय आहे.     

‘मेमरी फोम’ गादी हे ‘वेकफिट’चे प्रमुख उत्पादन असून, याची रचना आणि डिझाईन्स ग्राहकांच्या गरजा आणि प्राधान्य यांचा सखोल अभ्यास केल्यानंतरच अंमलात आणली गेली आली आहेत. ‘कूलफिट’सारख्या प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आणि २० वर्षांची हमी असलेल्या उत्पादनांनी ‘वेकफिट’ला इतर उत्पादनांपेक्षा वेगळे ठरवले आहे. ‘ओपन सेल’ नावाचे तंत्रज्ञान या गादीच्या अगदी वरच्या थरात वापरले जाते आणि त्यामुळे खेळती राहणारी हवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एक सुखद गारवा निर्माण करते. ज्यामुळे ग्राहकांना एखाद्या उबदार आरामदायी कोषात झोपल्याची अनुभूती मिळते.

‘वेकफिट’चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित गर्ग म्हणाले, ‘आजवरच्या विस्कळीत, व्यवस्थापनरहित अशा गाद्या-उत्पादन क्षेत्राला आकार देण्याचे काम वेकफिट करीत आहे. आमच्या मेमरी फोम या गादीच्या रूपाने एक मजबूत आणि तरीही आरामदायक उत्पादन ग्राहकांना उपलब्ध झाले आहे. यातले ५० हजारांहून जास्त एकसंध फोमसेल्स स्प्रिंगसारखे काम करतात आणि यातून साकारते एक ७८ इंची गादी जी कुठल्याही इतर साधारण ५० इंची गादीपेक्षा जास्त दर्जेदार असते. शिवाय इतर कुणीही देत नसलेल्या हमी योजनांमुळे जास्तीत जास्त ग्राहकांची मने जिंकून संपूर्ण भारत देशाला सुखाची झोप देण्याची आमची महत्वाकांक्षा आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search