Next
‘विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनाला प्रोत्साहन द्या’
माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांचे आवाहन
प्रेस रिलीज
Thursday, January 24, 2019 | 05:25 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘चंगळवादाचा धोका वाढत असताना शिक्षणातून चारित्र्य संवर्धन होण्याची जबाबदारीही वाढली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनाला आपण शिक्षण प्रक्रियेत प्रोत्साहन दिले पाहिजे आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा घेण्यासाठी वाचनाचे सकस पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत,’ असे आवाहन राज्याचे माजी शिक्षण संचालक आणि नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांनी काढले.

संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन कोथरूड येथील एमआयटीच्या प्रांगणात उत्साहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटीच्या विश्वस्त डॉ. स्वाती चाटे-कराड होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून राज्याच्या उच्च माध्यमिक-माध्यमिक परीक्षा मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे उपस्थित होत्या. या वेळी किसन बुचडे, प्राचार्य नागनाथ सानप यांच्या हस्ते डॉ. पठाण यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. पठाण म्हणाले, ‘जागतिकीकरणाचा लोंढा येत असताना चंगळवाद वाढत आहे. चारित्र्य घडण या शिक्षणाच्या मूळ उद्देशाकडे दुर्लक्ष होत आहे. मग आदर्श समाज कसा घडणार असा प्रश्न पडतो. समाजात अन्याय, अत्याचार, अस्वस्थता वाढत असताना शिक्षणातून चारित्र्य संवर्धन होणार नसेल, तर ते कुचकामी ठरेल.’

‘मराठी माध्यमाचे विद्यार्थी भाग्यवान आहेत, कारण त्यांना अवांतर वाचनासाठी भरपूर चांगले पर्याय उपलभ आहेत. वाचनातून भेटणाऱ्या सकस व्यक्तिरेखा वाचून आणि भोवतालची उत्तुंग व्यक्तिमत्वे पाहून विद्यार्थी प्रेरित होऊ शकतात,’ असेही डॉ. पठाण यांनी नमूद केले.

डॉ. काळे यांनी तणावमुक्त होऊन शालांत परीक्षा कशी द्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. तर डॉ. स्वाती चाटे-कराड यांनी मराठी विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न ठाव्ण्याचे आवाहन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link