Next
‘पीएनजी’तर्फे ‘असली हिरा ऑफ माय लाइफ’ स्पर्धा
प्रेस रिलीज
Tuesday, January 15, 2019 | 05:10 PM
15 0 0
Share this article:पुणे : पीएनजी ज्वेलर्सने रेड एफएमच्या सहयोगाने पुण्यातील ग्राहकांसाठी ‘असली हिरा ऑफ माय लाइफ’ या स्पर्धेचे नुकतेच आयोजन केले होते. स्पर्धेतील विजेत्या अर्जुन रंगपुरे यांना एक लाखांचा हिर्‍यांचा हार बक्षीस म्हणून देण्यात आला. हा कार्यक्रम हडपसर येथील पीएनजी ज्वेलर्सच्या भव्य दालनात पार पडला.

ही स्पर्धा डिसेंबर २०१८च्या चार आठवड्यांत घेण्यात आली होती. दररोज हिर्‍यांशी निगडीत प्रश्‍न आरजेच्या माध्यमातून श्रोत्यांना विचारण्यात आले. यात नाविन्यपूर्ण आणि अनोखे उत्तर देणार्‍या व्यक्तीला चांदीचे नाणे जिंकण्याची संधी मिळाली. दर शनिवारी ‘पीएनजी’च्या विविध दालनांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करून प्रत्येक आठवड्यातील पाच विजेत्यांना चांदीची नाणी बक्षीस म्हणून देण्यात आली. हिर्‍यांचे असे कोणते पैलू आहेत, ज्यामुळे आपण त्यांचे जतन करतो, तुमच्या आयुष्यातील असा कुठला तरी क्षण जो तुम्ही हिर्‍यासारखाच आयुष्यभर जपून ठेवाल आणि तुमच्या आयुष्यातील असली हिरा कोण आहे, यांसारखे प्रश्न श्रोत्यांना विचारण्यात आले होते.

३१ डिसेंबर २०१८ रोजी हडपसर येथे या स्पर्धेचा अंतिम सोहळा पार पडला. यादरम्यान करण्यात आलेल्या आरजे स्टुडिओ शिफ्टचे आयोजन हे भेट देणार्‍यांचे आकर्षण ठरले. या वेळी सूत्रसंचालकाने उपस्थित लोकांसोबत इंटरअ‍ॅक्टिव्ह गेम्स खेळला आणि विजेत्यांना पारितोषिके दिले. पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांच्या हस्ते लकी ड्रॉमधून अंतिम विजेता ठरलेल्या अर्जुन रंगपुरे यांना बक्षीस प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना ‘पीएनजी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘पीएनजी ज्वेलर्सने नेहमीच ग्राहकांच्या समाधानावर लक्ष्य केंद्रित केले आहे. अशा प्रकारच्या स्पर्धा ब्रँड आणि ग्राहकांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते, जे नेहमीच्या व्यावसायिक दिवसांपेक्षा वेगळे ठरते. अशा स्पर्धा ग्राहकांना हमी देतात. ब्रँड हा ग्राहकांशी स्नेह ठेवणारा आहे आणि त्यामुळे ब्रँडची गुणवत्ता वाढण्यास मदत होते. ‘पीएनजी’चा असा विश्‍वास आहे, की ग्राहक हा राजा आहे आणि त्यासाठीच आम्ही वितरणाच्या नवनवीन पुढाकारांमध्ये गुंतवणूक करतो जेणेकरून ग्राहकांना चांगले वाटते.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search