Next
सामाजिक मानसशास्त्र परिषदेसाठी डॉ. कराडे तैवानला रवाना
प्रेस रिलीज
Tuesday, July 09, 2019 | 01:40 PM
15 0 0
Share this article:

डॉ. जगन कराडकोल्हापूर : एशियन असोसिएशन ऑफ सोशल सायकॉलॉजी (एएएसपी), ताइपै यांच्या वतीने १० ते १३ जुलै २०१९ या कालावधीत तैवान येथे आयोजित केलेल्या आंतराराष्ट्रीय सामाजिक मानसशास्त्र परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील समाजशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. जगन कराडे रवाना झाले आहेत. ‘मायग्रेशन अँड अनऑर्गनाइज्ड सेक्टर इन इंडिया : ए केस स्टडी ऑफ कोल्हापूर सिटी’ या विषयावर ते शोधनिबंध सादर करणार आहेत. 
 
डॉ. कराडे यांचे राष्ट्रीय आणि आंतराराष्ट्रीय पातळीवर ११ संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. यातील दोन ग्रंथ लंडनमधील केम्ब्रिज स्कॉलर पब्लिकेशन येथून प्रकाशित झाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी राज्य पातळीवर कार्यरत असणाऱ्या मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले आहे. राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या इंडियन सोशिओलॉजीकल सोसायटी या संस्थेच्या व्यवस्थापन समितीवर ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत. 

या पूर्वी त्यांनी व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) व टोरोंटो (कॅनडा) येथे झालेल्या आंतराराष्ट्रीय परिषदेमध्येही सहभाग घेतला होता.  याचबरोबर टोरोंटो येथे झालेल्या आंतराराष्ट्रीय परिषदेत डब्ल्यूजी-०५ (फॅमिनियन अँड सोसायटी) या संशोधन समितीच्या २०१८ ते २०२२ या कालावधीसाठी संशोधन समितीच्या कार्यकारिणीवर सदस्य म्हणूनही त्यांची निवड झाली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search