Next
आझम कॅंपसमध्ये मतदार नोंदणी केंद्र
प्रेस रिलीज
Saturday, October 13, 2018 | 04:34 PM
15 0 0
Share this article:

पुणे : आझम कॅंपसमध्ये डॉ. पी. ए. इनामदार मतदार नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. जुने ट्रस्ट ऑफिस, असेम्ब्ली हॉलसमोर सुरू करण्यात आलेल्या या केंद्राची वेळ सकाळी १० ते सायंकाळी पाच अशी आहे. नोंदणीसाठी ३० ऑक्टोबर हा शेवटचा दिवस आहे.

‘ज्यांचे मतदान कार्ड नसेल आणि वय ३१ जानेवारी २०१८पर्यंत १८ वर्षे आहे, त्यांनी त्वरित या केंद्रावर संपर्क साधावा,’ असे आवाहन करण्यात आले आहे. मतदान कार्डासाठी पासपोर्ट आकाराचे फोटो, पत्त्याचा पुरावा, वयाचा दाखला आणि ओळखपत्राची आवश्यकता आहे.  

‘पत्त्याचा पुरावा, वयाच्या दाखला आणि ओळखपत्रासाठी आधार कार्ड, पासपोर्ट, गॅसपावती, पाणी बील, रेशनकार्ड, लाइट बिल, बँक पासबुक, एसएससी प्रमाणपत्र, जन्मदाखला, पॅनकार्ड, किसान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, विद्यार्थी ओळखकार्डची झेरॉक्स आदी कागदपत्रांच्या मदतीने ऑनलाइन, ऑफलाइन नोंदणी करता येईल,’ असे संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search