Next
अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग दोन
BOI
Tuesday, June 04, 2019 | 12:26 PM
15 0 0
Share this article:

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. ते ऑडिओ बुकगंगा वेबसाइटवरून मोफत ऐकता येणार आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या या ध्वनिनाट्याच्या दुसऱ्या भागात काय ऐकता येईल, त्याबद्दल ही माहिती...
............
लहानग्या विनायकाने प्रचंड वाचन, लेखन आणि चिंतन करून भारतीय पौराणिक कथा, इतिहासातील मुख्य घटना आणि अनेक देशभक्तिपर कविता आत्मसात केल्या. लावणी, लोकगीते आणि शाहिरी पोवाडे लिहिणाऱ्या कवी गोविंदांची प्रतिभा ओळखून, त्यांना राष्ट्रभक्तिपर पोवाडे, कवने लिहिण्यास विनायकाने प्रवृत्त केले. १८९७ साली प्लेगच्या साथीने महाराष्ट्रात थैमान घातले. ब्रिटिशांनी याचा फायदा घेऊन जागोजागी घरांवर धाडी टाकून सर्वसामान्यांवर अत्याचार केले. पुण्यात चापेकर बंधूंनी कर्नल रँडच्या या कृत्याचा बदला त्याची हत्या करून घेतला आणि ते फासावर गेले. हे पाहून प्रगल्भ बुद्धीच्या विनायकाच्या मनात ब्रिटिश सरकारविरुद्ध प्रचंड राग उफाळला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य सशस्त्र क्रांतीचे मार्ग वापरून, झोकून देण्याचा निश्चय विनायकाने आपल्या सहविचारी मित्रांसमवेत केला आणि तो जोपासला आयुष्याच्या अखेरीपर्यंत.
  
लेखक/दिग्दर्शक : माधव खाडिलकर
संगीत : आशा खाडिलकर
निर्मिती : ओंकार खाडिलकर
सहनिर्माते : रिव्हर्ब प्रोडक्शन्स
संगीत संयोजन : आदित्य ओक
ध्वनिसंयोजन : मंदार कमलापूरकर
डिजिटल पार्टनर : स्मृतिगंध
सौजन्य : उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट

(ध्वनिनाट्याचा दुसरा भाग ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. ध्वनिनाट्याचा पहिला भाग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. या ध्वनिनाट्याचा तिसरा भाग ११ जून २०१९ रोजी प्रसारित होणार आहे. या नाटकाची आणि ध्वनिनाट्याची निर्मितीकथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )




 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search