Next
नाट्यसंस्कार कला अकादमीची रत्नागिरी शाखा सुरू
पहिल्याच बालनाट्य संस्कार परीक्षेमध्ये ८० मुलांचा सहभाग
BOI
Monday, September 10, 2018 | 03:04 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
नाट्यसंस्कार कला अकादमीच्या रत्नागिरी शाखेचे नुकतेच उद्घाटन झाले. शुभारंभाच्या दुसऱ्याच दिवशी ‘जीजीपीएस’ शाळेत आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य संस्कार प्रथम परीक्षेला तब्बल ८० विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थी आणि पालकांसाठी एक कार्यशाळा घेण्यात आली होती. नाट्यसंस्कार कला अकादमीची रत्नागिरी शाखा आसावरी शेट्ये यांच्या पुढाकाराने सुरू झाली आहे. त्या रत्नागिरी शाखेच्या प्रमुख आहेत. जयेश मंगल पार्क येथे उद्घाटन कार्यक्रम झाला. या वेळी प्रकाश पारखी यांचा ‘नकला नगरी’ हा एकपात्री नाट्यप्रयोग झाला. त्याबरोबर संस्थेच्या विश्वस्त दीपाली निरगुडकर आणि प्रकाश पारखी यांचा ‘शब्दांच्या पलीकडे’ हा द्विपात्री नाट्यप्रयोगही झाला. उद्घाटनप्रसंगी झालेल्या या नाट्यप्रयोगाला रसिकांची दाद मिळाली.बालनाट्य संस्कार प्रथम परीक्षेचे महत्त्व, स्वरूप, परीक्षा केंद्र प्रमुखांच्या जबाबदाऱ्या याबद्दल नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी मार्गदर्शन केले. याचबरोबर या परीक्षेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यशाळेला मिळालेला प्रतिसाद पाहून या परीक्षेचे पहिले पाऊल यशस्वीपणे पडल्याचे मत पारखी यांनी व्यक्त केले. यावेळी नाट्यसंस्कार कला अकादमीचे विश्वस्त आणि सदस्य उपस्थित होते. यासाठी रत्नागिरीच्या शाखाप्रमुख आसावरी शेट्ये यांच्यासह शाखेचे सहकारी किरण जोशी, अॅड. सरोज भाटकर यांनी विशेष मेहनत घेतली. शाखेच्या उद्घाटनप्रसंगी रत्नागिरीतील मान्यवर, ज्येष्ठ रंगकर्मी अनिल दांडेकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे रत्नागिरी शाखा कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, सतीश दळी, दादा लोगडे, लहू घाणेकर, लेखक डॉ. श्रीकृष्ण जोशी आदींनी उपस्थित राहून शाखेला आणि परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या. उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती कानविंदे यांनी केले.नाट्यशास्त्र लहानपणीच मुलांमध्ये रुजावे यासाठी नाट्यसंस्कार कला अकादमी गेली अनेक दशके काम करत आहे. भालबा केळकर करंडक, दिवाकर स्मृती नाट्यछटा अशा बालनाट्यविश्वातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या स्पर्धांचे आयोजन नाट्यसंस्कार कला अकादमी गेली अनेक दशके करत आहे. 

बालनाट्य संस्कार, किशोर नाट्यसंस्कार, कुमार नाट्यसंस्कार असे परीक्षेचे तीन टप्प्यांत अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी यंदा केवळ बालनाट्य संस्कार या अभ्यासक्रमाची परीक्षा झाली. पहिली परिक्षा तोंडी आणि प्रात्यक्षिक स्वरूपात होती. या परीक्षेचे चित्रीकरणही केले गेले. सात ते १६ वर्षे वयोगटातील मुलांनी ही परीक्षा दिली. कॅमेऱ्यासमोर नाव, पत्ता, छंद सांगणे, दोन मिनिटांची नाट्यछटा, साभिनय बालगीत, भरतमुनींची ओळख, शास्त्रीय संगीताचे आरोह, अवरोह, दोन/तीन अलंकार, नक्कल करणे, गोष्ट सांगणे आदी विषयांचा समावेश बालनाट्य संस्कार परीक्षेत करण्यात आला आहे. शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, तबला, पेटी, चित्रकला यांच्या परीक्षा देता येतात. त्याचे मार्क आता दहावीच्या गुणांमध्ये वाढू शकतात; पण या सगळ्यांचा समावेश असलेली नाटक ही कला मात्र केवळ परीक्षा नाही म्हणून आतापर्यंत दुर्लक्षित होती. महाराष्ट्र शासनाने आता अध्यादेश काढला असून, तो अभिनंदनीय आहे. त्यानुसार, राज्य बालनाट्य स्पर्धेत पारितोषिकप्राप्त तीन क्रमांकांना गुण मिळणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रात अनेक केंद्रांवर हजारो बाल कलाकार सहभागी होतात. तसेच शिबिराच्या माध्यमातून रंगमंचावर येतात. बालनाट्यात किंवा शिबिराच्या माध्यमातूनही सहभागी होतात; पण त्यांना परीक्षा नाही म्हणून गुण मिळू शकत नाहीत. म्हणूनच नाट्यसंस्कार कला अकादमीने परीक्षा घेण्याचे ठरविले आहे, असे अकादमीतर्फे स्पष्ट करण्यात आले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search