Next
उत्तमोत्तम वाळूशिल्पांनी सजला मालवणचा चिवला किनारा
BOI
Saturday, January 19, 2019 | 12:47 PM
15 0 0
Share this storyमालवण :
मालवणच्या चिवला समुद्रकिनाऱ्यावर नुकतीच वाळूशिल्प स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. केंद्रप्रमुख अनिल खडपकर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी ही मालवण केंद्रस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याबरोबरच लेक शिकवा अभियानांतर्गत शिक्षिकांसाठीही ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थी आणि शिक्षिकांनी विविध संदेश देणारी ४५ सुंदर वाळूशिल्पे किनाऱ्यावर साकारली. 

या स्पर्धेचे उद्घाटन मालवण नगरपालिकेचे बांधकाम सभापती गणेश कुशे यांच्या हस्ते झाले. वाळूशिल्प बनविण्यासाठी रूपेश नेवगी आणि बलराम सामंत या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाळूशिल्प स्पर्धेदरम्यान मालवणच्या सभापती सोनाली कोदे, उपसभापती अशोक बागवे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरपालिका मुख्याधिकारी रंजना गगे, विजय केनवडेकर, नगरसेवक आप्पा लुडबे, नगरसेविका सेजल परब, कासवकर, नगरसेवक मंदार केणी, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित, सर्व शिक्षा अभियानाच्या विषयतज्ज्ञ गौरी नार्वेकर, आरती कांबळी, मेघना जोशी, नंदिनी साटलकर, टोपीवाला हायस्कूलचे मुख्याध्यापक अवसरे सर अशा विविध मान्यवरांनी भेट देऊ स्पर्धकांना प्रोत्साहन दिले आणि त्यांचे कौतुक केले. स्पर्धेचे बक्षीस वितरण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, केंद्रप्रमुख अनिल खडपकर, रूपेश नेवगी, अवसरे सर, नार्वेकर मॅडम, कांबळी मॅडम, जोशी मॅडम, साटलकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा ठाकूर यांनी केले आणि आभार शिवराज सावंत यांनी मानले. वाळूशिल्प स्पर्धा पाच गटांत घेण्यात आली होती. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -

पहिला गट - इयत्ता पहिली ते चौथी
प्रथम - कुडाळकर प्राथमिक शाळा
द्वितीय – जि. प. शाळा मालवण, दांडी 
तृतीय - कन्याशाळा प्राथमिक 

दुसरा गट - पाचवी ते सातवी (प्राथमिक) 
प्रथम – कन्याशाळा, मालवण 
द्वितीय - जि. प. शाळा, मालवण, दांडी 
तृतीय - रोझरी चर्च स्कूल, मालवण 

तिसरा गट - पाचवी ते सातवी (माध्यमिक )
प्रथम – जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल
द्वितीय - भंडारी हायस्कूल, मालवण 
तृतीय - टोपीवाला हायस्कूल, मालवण 

चौथा गट - आठवी ते दहावी (माध्यमिक) 
प्रथम - टोपीवाला हायस्कूल, मालवण 
द्वितीय - भंडारी हायस्कूल, मालवण 
तृतीय – जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल 

पाचवा गट - शिक्षिकांचा
प्रथम - जय गणेश टीचर गट
द्वितीय - सुपर वुमन गट
तृतीय - मुक्ता गट
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link