Next
खुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी
BOI
Monday, December 10, 2018 | 03:21 PM
15 0 0
Share this story

खुशी रावराणेरत्नागिरी : शहरातील रा. भा. शिर्के प्रशालेची विद्यार्थिनी असलेली खुशी रावराणे सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवरील दम-दमा-दम कार्यक्रमाच्या पहिल्या फेरीची विजेती ठरली असून, पुढील फेरीत दाखल झाली आहे. तिच्या सादरीकरणाबद्दल परीक्षक दीपाली सय्यद यांनी तिचे खास कौतुक केले.

सांस्कृतिक क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्याचे नाव सध्या अग्रक्रमाने घेतले जात असून, येथील कलाकार नृत्य, वादन, गायन या कलाप्रकारांमध्ये राज्यासह देशभरात नाव कमावत आहेत. खुशी ही त्यातीलच एक असून, सध्या ती नववीत शिक्षण घेत आहे; तसेच नटराज नृत्य क्लासेसच्या सोनम जाधव यांच्याकडे गेली चार वर्षे कथ्थकचे धडे गिरवीत आहे. दूरदर्शनवरील नृत्यासाठी तिला उदय कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

खुशी ही मूळची कणकवली तालुक्यातील (जि. सिंधुदुर्ग) लोरे गावची असून, शिक्षणानिमित्ताने ती रत्नागिरीत राहत आहे. आजपर्यंत तिने अनेक नृत्य स्पर्धांमधून यश मिळवले आहे. तिच्या यशात नृत्य शिक्षकांसह पालकांचे प्रोत्साहन मोलाचे ठरल्याचे तिने सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
shashank mohire.mm About 100 Days ago
mast.no.1
1
0
Rekha R. Pradhan About 101 Days ago
Very nice Ratnagiri che and school che name usual kelayabadal dhanyavad and pudil vatchalisati Shubecha
1
0
Suryakant gajanan sawant About 106 Days ago
Very good best of luck keep it up
1
0
Prakash r salvi About 106 Days ago
Fantastic performance. Keep it up.
1
0

Select Language
Share Link