Next
गोयल गंगा फाउंडेशनतर्फे गुरुवर्य पुरस्काराचे वितरण
BOI
Monday, November 19, 2018 | 04:58 PM
15 0 0
Share this story

गुरुवर्य पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी सोनू गुप्ता, कर्नल संभाजी पाटील, गीता गोयल, पुरस्कार विजेते विपुल शहा, अमित गोयल, स्वाती चाटे आणि गौरांग प्रभूजी

पुणे : शैक्षणिक प्रणालीत अमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने कार्यरत असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांना गोयल गंगा फाउंडेशनतर्फे गुरुवर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता मुलांच्या अंगभूत गुणांना वाव देत, वेगळाच आदर्श प्रस्थापित केलेल्या राळेगणसिद्धी येथील संत निलोबराय विद्यालयाचे मुख्याध्यापक तुकाराम वाघचौरे, ग्रामीण भागातही शहरी दर्जाचे शिक्षण पोहोचण्याच्या तळमळीने कार्यरत असलेले रणजितसिंग देसले, भारतीय शिक्षण पद्धतीतील मूल्यांचे महत्व पटवून देण्यासाठी झटणारे इस्कॉन फाउंडेशन, विशेष शिक्षण पद्धतीचा आग्रह धरत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मंजूश्री पाटील आणि मुलांना शिकण्याची  गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने नाविन्यपूर्ण कल्पनांचा ध्यास घेतलेले विपुल शहा या पुरस्कारार्थींना गौरांग प्रभूजी,  कर्नल संभाजी पाटील आणि  स्वाती चाटे यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. 

मंजूश्री पाटील यांना सन्मानित करताना सोनू गुप्ता, अमित गोयल, गौरांग प्रभूजी आणि स्वाती चाटे

या वेळी गोयल गंगा फाउंडेशनचे विश्वस्त अमित गोयल, गीता गोयल, गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका सोनू गुप्ता, मुख्याध्यापिका भारती भागवाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

तुकाराम वाघचौरे यांना सन्मानित करताना गौरांग प्रभूजी आणि सोनू गुप्ता

या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या हस्ते या कार्यक्रम सोहळ्याचे उद्घाटन झाले. ‘बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रात होणारे बदल वा त्यात येणारे अडथळे’ या विषयी एस. बी. मंत्री, डॉ. अश्विनी कुलकर्णी, विजय गुप्ता,  संजीव सोनावणे यांनी आपली मते व्यक्त केली, तर ‘चारित्र्य व विकासाचे महत्त्व’ या विषयी गौरांग प्रभूजी यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले.    
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link