Next
‘स्विमिंग फेडरेशन’तर्फे राज्यस्तरीय निवड चाचण्या
प्रेस रिलीज
Wednesday, May 09 | 05:04 PM
15 0 0
Share this story

पुणे : स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियातर्फे जलतरण, डायव्हिंग आणि वॉटर पोलो या खेळांमध्ये कनिष्ठ (ज्युनियर) व उपकनिष्ठ (सबज्युनियर) गटातील खेळाडूंच्या निवडीसाठी चाचणी फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स काँप्लेक्स येथील जलतरण तलावावर २५ ते २७ मे २०१८ दरम्यान रोज सकाळी सात वाजल्यापासून चाचणी फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. राष्ट्रीय उपकनिष्ठ आणि कनिष्ठ अॅक्वाटिक चँपियनशिपसाठी पाठवल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय संघासाठी २४ जून रोजी खेळाडूंची निवड केली जाणार आहे.

चाचणी फेऱ्या घेण्यासाठी डेक्कन जिमखाना क्लबला प्राधिकृत करण्यात आले आहे असून, स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे दोन सभासद या वेळी देखरेखीसाठी हजर राहणार आहेत. महाराष्ट्रातील रहिवासी असलेले खेळाडू निवड चाचण्यांसाठी डेक्कन जिमखानाकडे प्रवेश अर्ज करू शकणार आहेत.

अर्जाबरोबर खेळाडूच्या जन्मदाखल्याची प्रत (इंग्लिशमध्ये) आणि आधार कार्डाची प्रत, तसेच नोंदणी व प्रवेश शुल्क पाठवावे लागणार आहे. १९ मे २०१८पूर्वी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत डेक्कन जिमखाना येथे प्रवेश अर्ज करता येणार आहे.

जलतरणपटूंची निवड स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या पात्रता निकषांनुसार केली जाणार असून, चाचणीनंतर त्यांचे अर्ज 'स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया'कडे सोपवले जातील. वॉटर पोलो प्रकारात निवडल्या जाणाऱ्या१३ खेळाडूंची, तर डायव्हिंगमध्ये प्रत्येक प्रकारात निवडल्या जाणाऱ्या जास्तीत जास्त दोन खेळाडूंची नावे पाठवली जाणार आहेत. खेळाडूंच्या राहण्याची वा जेवणाची सोय त्यांनी स्वतःच करणे अपेक्षित आहे.

अर्ज करण्यासाठी पत्ता पुढीलप्रमाणे : क्लब हाऊस बिल्डिंग, ७५९/१ डेक्कन जिमखाना, पुणे- ४.
अधिक माहितीसाठी संपर्क : जय आपटे- ९८२२४ ३१०१५
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link