Next
‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे
प्रेस रिलीज
Monday, July 23, 2018 | 03:41 PM
15 0 0
Share this storyमुंबई : गेले तीन महिने ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच लोणावळा येथे पार पाडला. यात मेघा धाडे हिने ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेता होण्याचा मान पटकावला, तर पुष्कर जोगने दुसरे स्थान मिळवले. मेघा धाडेला १८ लाख ६० हजार इतकी धनराशी आणि खोपोली येथे सिटी ऑफ म्युझिककडून एक घर बक्षीस रूपात मिळाले.

‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमाची धमाकेदार सुरुवात तीन महिन्यांपूर्वी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर झाली. कार्यक्रमाच्या घोषणेपासूनच या कार्यक्रमामध्ये कोण कोण असेल, कोण याचे सूत्रसंचालन करेल आणि मुख्य म्हणजे पहिल्या पर्वाचा विजेता कोण असेल याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. ‘कलर्स’ने ‘बिग बॉस’चे मराठमोळे रूप प्रेक्षकांच्या भेटीस आणले. या पर्वाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. कार्यक्रमादरम्यान प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकण्यास सुरुवात केली. मराठमोळ्या ‘बिग बॉस’च्या पहिल्या सिझनमध्ये सदस्य १०० दिवस अनेक कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत राहिली.

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाबद्दल बोलताना कलर्स मराठी, गुजराती आणि व्हायाकॉम१८ मोशन पिक्चर्स प्रादेशिक चित्रपटचे व्यवसाय प्रमुख निखिल साने म्हणाले, ‘बिग बॉस मराठी या कार्यक्रमाबद्दल अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये असले, तरीदेखील एक महत्त्वाची गोष्ट आमच्या मनामध्ये होती आणि ती म्हणजे या कार्यक्रमातील मराठीपणा टिकवून ठेवणे. स्पर्धकांची निवड देखील ही गोष्ट लक्षात ठेउनच करण्यात आली होती. बिग बॉस मराठीचे पहिले पर्व संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन रोज बघितले हेच या कार्यक्रमाचे यश आहे; तसेच या कार्यक्रमामध्ये अनेक वाद–विवाद झाले, अनेक चर्चा झाल्या, कार्यक्रमाबद्दल अनेक प्रतिक्रिया आल्या हे देखील या कार्यक्रमाला मिळालेले यशच आहे असे मी म्हणेन.’

महेश मांजरेकर म्हणाले, ‘बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचे पहिले पर्व अतिशय छान पार पडले. प्रेक्षकांचे भरभरून प्रेम या पर्वाला मिळाले. मेघा, पुष्कर आणि सई यांची तिगडी पुढे जाईल असे मला पहिल्यापासून वाटले होते. मेघा अत्यंत हुशार खेळाडू आहे. मेघाकडून कुठली चूक झाली, तर तिला माफी मागायला कधीच लाज वाटली नाही. ती प्रेमाने प्रेक्षकांची मने जिंकत गेली. ती या कार्यक्रमामध्ये पूर्ण अभ्यास करून आली होती. मेघाचे हळूहळू प्रेक्षकांबरोबरच नाते खूप भक्कम होत गेले आणि तिने विजेतेपद पटकावले असे मी म्हणेन’.

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे म्हणाली, ‘मी अनेक वर्षांपासून बघितलेले स्वप्न आज पूर्ण झाले त्याचा मला खूप आनंद होतो आहे. कलर्स मराठी आणि इंडेमॉल टीमची मी आभारी आहे की, त्यांनी मला माझे स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा भाग होण्याची संधी मिळाली आणि आता मी हे पर्व जिंकले आहे यावर मला विश्वासच बसत नाहीये.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link