Next
‘तनिष्क’मध्ये कोणत्याही कॅरेटवर शून्य घट
प्रेस रिलीज
Friday, June 08, 2018 | 03:31 PM
15 0 0
Share this story

मुंबई : दागिन्यांच्या खरेदीसाठी नेहमीच आधीपासून नियोजन केले जाते आणि ‘तनिष्क’चे नवीन धोरण ग्राहकांना त्यांचे जुने दागिने देऊन नवीन घेण्यात लाभ मिळवून देणारे आहे. ‘टाटा’चा हॉलमार्क आणि टाटा समुहाची हमी असलेले ‘तनिष्क’ नेहमीच सर्वांत अस्सल दागिने देण्यात अग्रेसर राहिले आहे. ‘तनिष्क’मध्ये जुन्या सोन्याला १०० टक्के मूल्य दिले जात असून, १४ कॅरट आणि त्यापुढील शुद्धतेच्या सोन्यावरील विनिमयावर शून्य टक्के घट मोजली जात आहे. त्यामुळे ‘तनिष्क’ला जुने दागिने देऊन त्या मोबदल्यात नवीन दागिने घेणे ग्राहकांसाठी लाभदायक ठरत आहे.

भारतातील नवीन सोने खरेदीदारांच्या बदलत्या गरजा ओळखणारा ‘तनिष्क’ हा दागिन्यांचा पहिला ब्रॅंड आहे. नवीन खरेदीदारांना सोन्याच्या अलंकारांना अधिक आधुनिक स्वरूपात मागणी आहे. डिझाइनवर त्यांचा भर असून, केवळ हे दागिने सणासुदीपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर दररोज वापरले जाऊ शकतील, असे हलक्या वजनाच्या दागिन्यांनाही मागणी आहे.

भारतातील ९० टक्के अलंकार बाजारपेठ असंघटित असून, ग्राहकाच्या पदरी अशुद्ध सोने पडण्याची शक्यता दाट असते. ग्राहकाने दर २५ ते ३० महिन्यांनी सोन्याचे दागिने अपग्रेड करणे महत्त्वाचे आहे. यावर अगदी स्थापनेपासून तनिष्कचा विश्वास आहे. कारण यामुळे ग्राहकांना नवीन ट्रेंड्स, नवीन डिझाइन्सनुसार दागिने घालता येतात आणि त्यांना त्यांच्या गरजा व आवडीनिवडींनुसार दागिने घेण्यात मदत मिळते.

ग्राहकांना नवीन दागिने खरेदी करण्यासाठी अनेक सराफ, अगदी स्थानिक सराफांकडूनही विनिमय (एक्सचेंज) ऑफर्स दिली जाते; मात्र, भारतीय अलंकार बाजारपेठेची व्याख्याच बदलून टाकतील अशी विनिमय (एक्स्चेंज) धोरणे व योजना आणणारा ‘तनिष्क’ हा भारतातील पहिला ब्रॅंड आहे. ‘तनिष्क’ने विनिमयाच्या संपूर्ण प्रक्रियेत अधिक विश्वासार्हता आणि पारदर्शकता आणली आहे.  

‘तनिष्क’विषयी :
‘तनिष्क’ या टाटा समूहाच्या सर्वाधिक लोकप्रिय दागिन्यांच्या ब्रँडने त्यांच्या अद्वितीय कारागिरी, खास डिझाइन्स आणि चोख व्यवहारामुळे गेल्या दोन दशकांमध्ये ग्राहकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले आहे. भारतीय स्त्रीचे अंतरंग समजून घेणारा आणि तिला तिच्या आवडीप्रमाणे कधी परंपरागत, तर कधी आजच्या युगाचे दागिने पुरवणारा एकमेव ब्रॅंड म्हणून ‘तनिष्क’ प्रसिद्ध आहे.

याच लौकिकाला साजेसा ‘भारतातला सर्वाधिक विश्वासार्ह दागिने ब्रॅंड’ हा पुरस्कार ‘तनिष्क’ला ‘ट्रस्ट रिसर्च अॅडव्हायजरी’ यांच्यातर्फे २०१७मध्ये मिळाला आहे. त्यांच्या या लौकिकाला अधोरेखित करणारी ‘तनिष्क’ शोरूम्स अद्ययावत अशा कॅरेटमीटरने सुसज्ज आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांच्या सोन्याची शुद्धता सर्वाधिक खात्रीलायक पद्धतीने पडताळता येते. सोने आणि हिऱ्यांच्या (२२ आणि १८ कॅरेट) पाच हजारांहून अधिक भारतीय आणि पाश्चात्य या दोन्ही डिझाइनचा मेळ घालणारे दागिने ‘तनिष्क’ पुरवते. अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा कारखान्यांमध्ये तयार झालेले दागिने म्हणजे कलेचा सर्वोच्च अविष्कार आहेत. ‘तनिष्क’च्या रिटेल साखळीत १५७ शहरांमधल्या २५४ खास शोरूम्स आणि बुटीक्स गुंफलेल्या आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link