Next
‘पराग मिल्क फुड्स’चा ‘कोलोप्लस एबी’शी सहयोग
प्रेस रिलीज
Tuesday, July 17, 2018 | 02:32 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतातील सर्वात मोठ्या खासगी दुग्धालय कंपन्यांपैकी एक असणाऱ्या पराग मिल्क फुड्स लिमिटेडने ‘गो कोलो पॉवर’ हे उत्पादन सुरू करण्यासाठी ‘कोलोप्लस एबी’ यांच्याशी सहयोग केल्याची घोषणा केली आहे. या सहयोगामुळे ‘पराग’च्या आरोग्य व पोषण विभागातील उत्पादनांमध्ये भर पडणार आहे.

गाईच्या पहिल्या धारेच्या दुधापासून बनवलेले कोलो पॉवर हे इम्युनोग्लोब्युलिन्स आणि प्रोबायोटिक्स यांनी समृद्ध असून, यामध्ये आईच्या दुधाएवढेच गुण आहेत. गो कोलो पॉवर पावडर स्वरूपातील उत्पादन असल्याने ते लापशीमध्ये मिसळता येते. यामुळे उच्च कोलोस्ट्रोम मूल्य वाढून एड्स, अतिसार आदी शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी करणाऱ्या रोगांशी लढण्यास मदत मिळते. कोलो पॉवर ही २०० ग्रॅम उपलब्ध असून, तिची किंमत ७५० रुपये आहे. हे उत्पादन ई-कॉमर्स मंचांवर आणि सर्व मेट्रो शहरांमध्ये उपलब्ध होईल.

कोलो पॉवरच्या गरजेवर भर देत कोलोप्लसचे सीईओ कोनी हॅगमन म्हणाले, ‘कोलोस्ट्रोम हे इम्युनोग्लोब्युलिन्स आणि पोषणद्रव्यांनी समृद्ध असते. ज्यामुळे रोगांना होणारा प्रतिकार वाढण्यास मदत होते. या दुधामुळे होणारे आरोग्यविषयक लाभ केवळ अर्भकांपुरते मर्यादित नसून सर्व वयोगटातील लोकांसाठी लाभदायक आहेत. आधी तुम्हाला कोलोस्ट्रोम फक्त कॅप्सूल किंवा शुद्ध पावडर स्वरूपात मिळत असे, परंतु आता ते शरीरामध्ये पूर्णपणे शोषत येत नसे. आता कोलो पॉवरसह लापशी या अन्न पदार्थाच्या स्वरूपात कोलोस्ट्रोमचे तेच लाभ मिळू शकतात आणि आमच्या पेटंटकृत तंत्रज्ञानासह याचे कितीतरी चांगले पोषण होते. कोलो पॉवरची चवही अतिशय चांगली आहे, हे तयार करण्यास सोपे आहे आणि हे जास्त काळ साठवता येते. स्वीडिश राजदूतावासाने पीएमएफएलसारख्या दर्जेदार आणि प्रतिष्ठित सहयोगीशी आमची भेट घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली, जी भारतीय नागरिकांना आरोग्यविषयक लाभ पुरवण्याचे उद्दिष्ट बाळगून सार्वजनिक आरोग्य सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहे.’

या सहयोगाविषयी बोलताना पराग मिल्क फुड्सचे अध्यक्ष देवेंद्र शहा, ‘पराग मिल्क फुड्सच्या कोलो पॉवरचे अनावरण हे सामाजिक बांधिलकीच्या जबाबदारीचे प्रतिक आहे. आमची अशी पहिली कंपनी आहे जिने एक अनोखा कोलोस्ट्रोम आधारित आरोग्यदायी अन्नपदार्थ घडवला आहे. जो आजारी रुग्णांना दीर्घकाळ इम्युनिटी, तर देतोच पण त्याच्या उच्च इम्युनोग्लोब्युमिन्स घटकासा तुम्हाला आयुष्यभराचे प्रतिबंधात्मक इम्युनिटी उभारण्यास मदत करतो. आम्ही दुग्धशाळेतील शेतकऱ्यांकडून कोलोस्ट्रोम दुध मिळवण्यासाठी एक सुरळीत यंत्रणा प्रस्थापित केलेली आहे जिच्यामुळे एरव्ही फुकट जाणारे पहिल्या धारेचे दुध वापरण्याचा मार्ग तर मिळतोच पण त्यांना उच्च उत्पन्नही मिळते. हे मूल्यवान कोलोस्ट्रोम नंतर गो कोलो पॉवरमध्ये रूपांतरित होते ज्यासाठी पेटंटकृत तंत्रज्ञानाचा वापर होतो. कोलो पॉवरमध्ये असलेले कोलोस्ट्रोम कर्करोग, अतिसार यांसारख्या रोगांनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांची इम्युनिटी वाढविण्यास मदत करते, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link