Next
वाटा आपल्या संस्कृतीच्या
BOI
Wednesday, June 27, 2018 | 10:13 AM
15 0 1
Share this story

आपली संस्कृती ही देशाच्या अभिमानाचे प्रतीक आहे. धर्म, इतिहास, भाषा, आयुर्वेद, सण, उत्सव, संस्कार, खगोल अशी सर्व शास्त्रे संस्कृतीत येऊन एकरूप होतात. त्यामुळेच आपल्या संस्कृतीची माहिती आपल्याला असणे आवश्यक असते. डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी या पुस्तकात आपल्या संस्कृतीविषयक अनेक गोष्टी सोप्या आणि रोचक भाषेत सांगितल्या आहेत.

गोमातेचे महत्त्व प्रथम आपल्याला समजते. त्यानंतर संस्कृतबद्दल त्यांनी विस्ताराने लिहिले आहे. कन्यागत महापर्वाची ओळख होते. ‘प्राचीन भारताचा इतिहास’ या डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या पुस्तकाची माहिती त्यांनी दिली आहे. प्राचीन खगोलयंत्रे हा कुतूहल जागवणारा विषयही या पुस्तकात आहे. तीर्थयात्रा, वेदाध्ययन, विवाह संस्कार याबरोबरच नवरात्रीविषयी त्यांनी तपशिलाने लिहिले आहे; तसेच संभाजी महाराज, बाजीराव, लोकमान्य यांच्याविषयीचे लेखनही पुस्तकात आहे.   

प्रकाशक : नाविन्य प्रकाशन
पाने : १५७  
किंमत : २३० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 1
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link