Next
राज्यातील १४६ ग्रामपंचायतींसाठी २३ जूनला मतदान
सरपंचपदांच्या ६२ रिक्त जागांसाठीही मतदान
प्रेस रिलीज
Monday, May 20, 2019 | 05:59 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘राज्यातील विविध २० जिल्ह्यांमधील १४६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तसेच ६२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील सहा हजार ७१९ सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २३ जून २०१९ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे,’ अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी २० मे रोजी दिली.

अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘जुलै ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. सार्वत्रिकसह सर्व निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे ३१ मे ते सहा जून या कालावधीत स्वीकारले जातील. दोन व पाच जून या दोन सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाही. नामनिर्देशनपत्रांची छाननी सात जूनला होईल. नामनिर्देशनपत्रे १० जूनपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान २३ जूनला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल; मात्र गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सकाळी ७.३० पासून दुपारी केवळ तीन पर्यंतच मतदानाची वेळ असेल. सर्व ठिकाणी मतमोजणी २४ जूनला होईल.’

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या : पालघर- सात, रायगड- आठ, रत्नागिरी- एक, नाशिक- ७४, धुळे- एक, जळगाव- एक, अहमदनगर- १०, पुणे- तीन, सातारा- तीन, सांगली- एक, कोल्हापूर- एक, उस्मानाबाद- एक, लातूर- दोन, नांदेड- एक, अकोला- एक, यवतमाळ- तीन, वाशीम- एक, बुलडाणा- एक, वर्धा- चार आणि चंद्रपूर- २२, एकूण- १४६.

पोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा : ठाणे- एक, पालघर- दोन, रायगड- १०, रत्नागिरी- पाच, सिंधुदुर्ग- एक, नाशिक- तीन, अहमदनगर- एक, नंदुरबार- दोन, पुणे- तीन, सोलापूर- एक, सातारा- सहा, औरंगाबाद- चार, नांदेड- आठ, उस्मानाबाद- दोन, परभणी- एक, वाशीम- दोन, बुलडाणा- एक, चंद्रपूर- एक आणि भंडारा- पाच, एकूण- ६२.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search