Next
‘शहरात विषमुक्त अन्न पिकवणे शक्य’
प्रेस रिलीज
Tuesday, June 05, 2018 | 04:12 PM
15 0 0
Share this story

‘शहर शेती’ कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ज्योती शहा.

पुणे : ‘घरातील सर्व नैसर्गिक कचरा वापरून,आपण उत्तमरित्या शहर शेती करू शकतो. इमारतीच्या छतावर, बाल्कनीत आणि सभोवतालच्या परिसरात भाजीपाला-अन्नधान्य आणि वनस्पतीची लागवड केल्यास त्याठिकाणी ओल्या कचऱ्यासह अनेक टाकाऊ वस्तू उपयोगात आणता येऊ शकतात’, अशी माहिती ज्योती शहा यांनी अन्नदाता आणि वनराई आयोजित  ‘शहर शेती’ विषयक कार्यशाळेत दिली.  यासंदर्भातील सादरीकरण आणि प्रात्यक्षिकही त्यांनी सादर केले.  

 त्या म्हणाल्या, ‘घरातील जो नैसर्गिक कचरा आहे, त्याला कचरा न म्हणता ‘झाडांचा खाऊ’ असे म्हणले गेले पाहिजे. नैसर्गिक कचऱ्यामध्ये भाजीच्या काड्या, चहाचा चोथा, राहिलेलं अन्न, देवाचं निर्माल्य अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो. शहरांमध्ये  कचरा, सांडपाणी प्रदूषण या समस्यांनी चिंताजनक परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे कमीत कमी कचरा निर्माण करून, अधिकाधिक कचरा घरच्या घरी जिरविण्याची नितांत गरज आहे.’  

‘शहर शेती’ कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कीटकशास्त्रज्ञ डॉ. राहुल मराठे
या वेळी कीटकशास्त्रज्ञ डॉ. राहुल मराठे यांनीही  मार्गदर्शन आणि सादरीकरण केले. डॉ. मराठे म्हणाले, ‘मित्र कीडा’ ही संकल्पना आपल्यात रुजवली जावी. शेतमालावर फवारली जाणारी कीटकनाशके आणि अन्नधान्यातील भेसळ यामुळे एकूणच मानवी आरोग्य धोक्यात आलेले आहे. किड्यांना मारल्यामुळे मूळ अन्नसाखळी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी शहरवासियांनी आपले अन्न आपणच पिकवले पाहिजे.’ 

या वेळी वनराईचे प्रभारी सचिव चंद्रकांत इंगुळकर उपस्थित होते.  सूत्रसंचालन अमित वाडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीनिवास खेर यांनी केले.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link